शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

बुलडाणा : देव्हारी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 13:17 IST

बुलडाणा: जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ ते २० किमी अंतरावर असलेल्या वनग्राम देव्हारी येथील ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ ते २० किमी अंतरावर असलेल्या वनग्राम देव्हारी येथील ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ६० वर्षापासून या गावाला जाण्यासाठी साधा रस्ताही नाही. त्यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांना एक निवेदनही ग्रामस्थांनी दिले आहे. या गावात रोजगार नाही, आरोग्य सुविधा नाहीत. शैक्षणिक सुविधांचाही येथे अभाव आहे. ग्रामस्थांनी आमदार, खासदारांना वेळोवेळी अनुषंगीक विषयान्वये निवेदने दिली आहेत. मात्र राजकीय व्यक्तींनीही येथील समस्या निराकरणासाठी पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे त्रस्त ग्रामस्थ शेवटी या पवित्र्यात आले आहे. त्यात शासकीय योजनांचा येथील शेतकर्यांनाही लाभ मिळत नाही. शेतकर्यांना मिळालेल्या वर्ग दोन च्या जमीनीच्या ७/१२ ची वाटणीपत्रक (पोटहिस्से) करण्यासाठी महसूल विभागाकडून परवानगी मिळावी जेणेकरून शेतकरी शासकीय योजनाचा लाभ घेऊ शकतील ही या ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.आरोग्य सुविधा नसल्याने गर्भवती महिलांना रस्ता नसलेल्या या गावातून रुग्णालयात नेतांना मोठी अडचण आहे. या असुविधांअभावी यापूर्वी येथे काही महिलांचा मृत्यू सुद्धा झाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिणामी जो पर्यंत येथील ग्रामस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत तो पर्यंत लोकसभा निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासंदर्भात माजी सरपंच साधना बुद्धेश्वर हिवाळे, आम्रपाली श्रीकृष्ण हिवाळे, अ‍ॅड. जीवन गवई, वंदना झीने, दिलीप पवार, बुद्धेश्वर हिवाळे, राजेंद्र जाधव, ऋषीकेश हिवाळे, धिरज हिवाळे यांच्यासह अन्य नागरिकांनी हे निवेदनन दिले आहे. प्रशासनाने प्रशासनाने येथे पायाभूत सविधा उपलब्ध कराव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९