शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : चार टक्के विद्यार्थ्यांचीच वसतिगृह, आश्रमशाळेत हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 11:07 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असल्याने मुलांना आश्रमशाळा, वसतिगृह व निवासी शाळेत पाठविण्याची पालकांमध्ये भीती आहे.

ठळक मुद्देअवघ्या चार टक्केच विद्यार्थ्यांची सध्या उपस्थिती राहत आहे.अनेक अडचणी आश्रमशाळेची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील २५ वसतिगृहे व आश्रमशाळा सुरू झालेल्या आहेत; परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असल्याने मुलांना आश्रमशाळा, वसतिगृह व निवासी शाळेत पाठविण्याची पालकांमध्ये भीती आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी अवघ्या चार टक्केच विद्यार्थ्यांची सध्या उपस्थिती राहत आहे. अनेक अडचणी आश्रमशाळेची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा-महाविद्यालय सुरू होण्याची विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतीक्षा होती. दरम्यान, इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग राज्य शासनाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा आणि विजाभज आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ४६ संस्थांपैकी २५ संस्था सुरू करण्यात आलेल्या आहेत; परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे वसतिगृह, निवासी शाळा व आश्रमशाळांमध्ये पाल्यांना पाठविण्यासाठी अनेक पालक तयार नाहीत. राज्य शासनाच्या आदेशानुसार मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी पालकांचे संमतिपत्र घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये बहुतांश पालकांनी संमतिपत्रामध्ये नकार दर्शविला आहे. जिल्ह्यात आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये एकूण २ हजार ३८९ विद्यार्थी संख्या आहे. त्यापैकी केवळ १११ विद्यार्थ्यांचीच उपस्थिती राहत आहे. यातील काही शाळा ह्या कोविड सेंटर असल्याने त्या आतापर्यंत सुरू करण्यात आलेल्या नाहीत. ज्या शाळा सुरू झाल्या त्यामध्ये पाल्यांना पाठविण्यास पालक तयार नसल्याचे चित्र आहे. अद्यापही येथील यंत्रणा सुरळीत झाली नसल्याचे निदर्शनास येत आहे.

आश्रमशाळांसमोर अडचणीपालकांकडून संमतिपत्र घेण्यात येत असल्याने अनेक पालक मुलांना आश्रमशाळेत पाठविण्यास तयार होत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील आश्रमशाळेत ७९४ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७१ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. ७२३ पालकांनी आश्रमशाळेत पाल्यांना पाठविण्यास संमती दिलेली नाही. त्यामुळे आश्रमशाळांसमोर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, विजाभज आश्रमशाळा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचेच वर्ग सुरू आहेत. ज्या शाळा, वसतिगृह  कोविड सेंटर अलगीकरण कक्षासाठी आहेत, त्या बंदच आहेत. त्यासाठी संबंधित तहसील कार्यालयांशी संपर्क साधत आहोत. - अनिता राठोड,  सहायक आयुक्त, समाजकल्याण.

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा