शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : संतप्त शेतक-यांनी केली केळवदच्या महावितरण कार्यालयाची होळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:06 IST

चिखली : ऐन हंगामात कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता महावितरणने शेतकर्‍यांचा विज पुरवठा खंडीत केल्याने २६ डिसेंबर रोजी संतप्त शेतकर्‍यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात केळवद येथील महावितरणचे कार्यालयाची होळी केली. दरम्यान हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता पाहता विद्युत वितरणने तातडीने शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला.

ठळक मुद्देखंडीत विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी शेतक-यांचा आक्रमक पवित्राआमदार राहुल बोंद्रे यांच्या पुढाकाराने खंडीत विद्युत पुरवठा पूर्ववत

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली (बुलडाणा ): ऐन हंगामात कोणत्याही पूर्व सूचना न देता महावितरणने शेतकर्‍यांचा विज पुरवठा खंडीत केल्याने २६ डिसेंबर रोजी संतप्त शेतकर्‍यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात केळवद येथील महावितरणचे कार्यालयाची होळी केली. दरम्यान हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता पाहता विद्युत वितरणने तातडीने शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला.

महावितरणच्या केळवद कार्यालयाअंतर्गत असलेल्या केळवद, शिरपूर, किन्होळा, वाडी ब्रम्हपुरी, गिरोला, हातणी या गावातील शेतकर्‍यांच्या विद्युत पुरवठा महावितरणने कोणतीही पूर्वसुचना न देता पाच दिवसांपासून खंडीत केला होता. यामुळे या गावातील ऐन भरात आलेले गहु, हरभरा, तूर, मका, कांदा व भाजीपाल्याची पिके धोक्यात आली होती. तर उपरोक्त गावातील अनेक शेतकर्‍यांनी विजबील भरले असून काहींना बिले देखील मिळालेली नाहीत. असे असताना महावितरणने अचानकपणे सरसकट कृषीपंपाचा विज पुरवठा खंडीत केल्याने उपरोक्त गावातील शेतकर्‍यांनी आ.राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात केळवद येथील कार्यालयावर धडक दिली असता तेथे कोणताही अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नव्हते. दरम्यान उशीराने येथे बुलडाणा येथून कार्यकारी अभियंता रामटेके उपस्थित झाले खरे मात्र, त्यांच्याकडूनही शेतकर्‍यांना दिलासा न मिळाल्याने शेतकर्‍यांनी संतापाच्या भरात केळवद येथील कार्यालयास आग लावली. दरम्यान आ.बोंद्रे यांनी जोपयर्ंत शेतकर्‍यांचा विजपुरवठा सुरळीत होत नाही तोपयर्ंत एकाही अधिकारी कर्मचार्‍याला येथून हलू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने कार्यकारी अभियंता रामटेके यांच्या सूचनेवरून खंडीत विजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

यावेळी आ.बोंद्रे यांच्यासह संजय पांढरे, प.स.सदस्य प्रभाकर वाघ, धाड सरपंच रीझवान सौदागर, रमेश सुरडकर, सरपंच निंबाजी सवडे, संजय गिरी, पिंटू गायकवाड, बाळु साळोख, राम जाधव, समाधान शेळके, नामदेव सदार, दिपक जाधव, दिलीप सुसर, अरूण शेळके, अशोक वानखेडे, संजय बाहेकर, भगवान राजपूत, शे.अन्सार, गणेश पांढरे, अशोक पाटील, सुनिल पाटील, समाधान पाटील, अमोल कालेकर, सुभाष भोसले, नंदु बोरबळे, भगवान पांढरे, श्रीकृष्ण पाटील, समाधान हाडे यांच्यासह केळवद, शिरपूर, किन्होळा, वाडी ब्रम्हपुरी, गिरोला, कोलारी, हातणी आदी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणchikhali roadचिखली रोडbuldhanaबुलडाणाRahul Bondreराहुल बोंद्रे