मेहकर : सध्या मेहकर शहरात व ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरु आहे. इतर कामांना बाजूला सारुन पंचायत समिती व नगर पालीका शौचालय बांधकाम करण्याच्या कामावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र शौचालय बांधकामाच्या या धामधुमीमध्ये शहरात व ग्रामीण भागात विकास कामांना मुहूर्त मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक गांव हागणदारीमुक्त झाले पाहिजे. यासाठी शासनाकाडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने अधिकारी तथा कर्मचारी सुध्दा प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून त्याचा नियमीत वापर करावा, यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. शहर तथा प्रत्येक खेडेगांव हागणदारी मुक्त होऊन नागरीकांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहीले पाहीजे, हा शासनाचा उद्देश जरी चांगला असला तरीपण शौचालयाच्या या कामामुळे अधिकारी कर्मचारी हे फक्त शौचालय बांधकामाच्या कामातच गुंतले आहेत. इतर विकास कामावर लक्ष देण्यास अथवा विकास कामे सुरु करण्यास अधिकारी कर्मचाºयास वेळच मिळत नाही. वरीष्ठ पातळीवरुन सतत सुचना, दौरे, पत्रव्यवहार, बैठका, सभा आदी कार्यक्रम सुरु असल्याने स्थानीक नगर पालीका व पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी शौचालय बांधकामाचे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन काम करीत आहेत. मेहकर नगर पालीकेच्या निवडणुका होऊन जवळपास एक वर्षाचा कालावधी झाला आहे. नगर पालीकेत काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षाची सत्ता आहे. मेहकर शहरातील सुज्ञ मतदारांनी दोन्ही पक्षाला समान न्याय देत विकास कामासाठी नगर पालीकेत पाठविले आहे; मात्र एक वर्ष होऊन शहरात अद्यापही विकास कामाला सुरुवात झालेली नाही. मागील पंचवार्षीक काळामध्ये विद्यमान नगराध्यक्ष हाजी कासम गवळी यांनी शहरातील सर्वच वार्डामध्ये विकासकामे केली होती; तर त्यांच्या कामाची पावती म्हणुन शहरवासीयांनी नगराध्यक्ष पदाची धुरा पुन्हा हाजी कासम गवळी यांच्या हाती दिली आहे. तर मागील पंचवार्षीक मध्ये सत्तेबाहेर असलेली शिवसेना आमच्या हाती सत्ता द्या, आम्ही विकास करु, असे म्हणणा-या शिवसेना पक्षाला सुध्दा शहर वासीयांनी मान्य करत नगर पालीकेत पाठविले आहे. तशीच परीस्थीती सध्या पंचायत समितीची झाली आहे. पं.स. च्या १२ सदस्यापैकी ९ सदस्य हे शिवसेनेचे आहेत. पंचायत समितीमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता असुनही व ८ ते ९ महिण्याचा कालावधी होऊनसुध्दा ग्रामीण भागात पाहिजे त्या प्रमाणात विकास कामाला सुरवात झाली नाही. घरकुल, सिंचन विहीर, रस्ते ही कामे अतिशय संथ गतीने सुरु आहेत. केवळ बैठका, दौरे, भेटीगाठी, यामध्येच वेळ जाताना दिसत आहे. परंतु अधिकारी वर्ग सध्या शौचालय बांधकामाच्या मोहीमेवर दिसत आहेत. शौचालय बांधकामाबरोबरच इतर विकास कामे व्हायला पाहीजेत, अशी अपेक्षा जनतेमधुन होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
मेहकर शहरात व ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 14:36 IST
मेहकर : सध्या मेहकर शहरात व ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरु आहे. इतर कामांना बाजूला सारुन पंचायत समिती व नगर पालीका शौचालय बांधकाम करण्याच्या कामावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.
मेहकर शहरात व ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ
ठळक मुद्देनगर पालीका व पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी शौचालय बांधकामाचे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन काम करीत आहेत. घरकुल, सिंचन विहीर, रस्ते ही कामे अतिशय संथ गतीने सुरु आहेत.