शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

नद्या, उपनद्यांवर पूलवजा बंधारे उभारावेत - हर्षवर्धन सपकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 01:30 IST

बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील भूजल पातळीत वाढ करण्यासोबतच नदी पलीकडील गावे व शेती कामात दळण-वळण व वाहतूक सुविधा सहजपणे उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोणातून पथदर्शक  आणि प्रायोगिक प्रकल्पांतर्गत नद्या व उपनद्यांवर २0 ठिकाणी पूलवजा बंधारे बांधण्यात यावे, अशी मागणी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी ११ मार्च रोजी दिल्ली येथे  केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक व जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देआ. हर्षवर्धन सपकाळ यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील भूजल पातळीत वाढ करण्यासोबतच नदी पलीकडील गावे व शेती कामात दळण-वळण व वाहतूक सुविधा सहजपणे उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोणातून पथदर्शक  आणि प्रायोगिक प्रकल्पांतर्गत नद्या व उपनद्यांवर २0 ठिकाणी पूलवजा बंधारे बांधण्यात यावे, अशी मागणी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी ११ मार्च रोजी दिल्ली येथे  केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक व जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, गडकरी यांनी याबाबत संबंधित विभागाच्या सचिवांना निर्देश देऊन संबंधित विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.लोकसभेच्या संयुक्त संसदीय समितीच्यावतीने १0 व ११ मार्च रोजी द्विदिवसीय राष्ट्रीय जनप्रतिनिधी संमेलन संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडले. या संमेलनासाठी पाठविण्यात आलेल्या प्रतिनिधी मंडळात आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागाी होती. संमेलनाच्या दुसºया दिवशी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक व जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.  दरम्यान, एका निवांत क्षणी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी गडकरी यांच्याशी संवाद साधून बुलडाणा व मोताळा तालुक्यांची भौगोलिक परिस्थिती विशद केली. अजिंठा पर्वतरांगा व पायथ्याशी दोन्ही तालुक्यामधून पैनगंगा, नळगंगा, विश्वगंगा, ज्ञानगंगा या नद्यांसह अनेक उपनद्या वाहतात. मात्र, भूगर्भीय रचना लक्षात घेता पाणी साठवण क्षमता अत्यंत मर्यादित असल्याने, हे दोन्ही तालुके अवर्षणप्रवण म्हणून ओळखले जातात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई व सिंचनाची पर्याप्त सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे पावसाळ््यात नदी-उपनदी पलीकडे असणाºया शेतामध्ये जाणे-येणे अडचणीचे ठरते. या पृष्ठभूमीवर दोन्ही तालुक्यातून वाहणाºया नद्या, उपनद्या व मोठ्या नाल्यांवर पथदर्शक प्रकल्पांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर २० ठिकाणी पूलवजा बंधारे  उभारल्यास भू-पृष्ठातील साठवणूक क्षमता वाढेल व सभोवतालच्या परिसरात भूगर्भीय जल पातळी वाढण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे पावसाळ््यामध्ये सुद्धा शेतात जाणे सोईचे होऊन दळणवळण वाहतुकीची सुविधा सहजपणे उपलब्ध होईल, असे आमदार सपकाळ यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.उपरोक्त प्रस्तावाबाबत सकारात्मकता दर्शवित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना सविस्तर व परिपूर्ण प्रस्ताव संबंधित विभागाकडून मागून घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.  

टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळNitin Gadakriनितिन गडकरी