लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा: कोथळी येथील विश्वगंगा नदीवर लाखो रुपये खर्च करुन बंधाराचे बांधकाम दोन वषार्पासुन झालेले आहे. परंतु प्रशासनाच्या चालढकल पणामुळे हा बंधारा अजूनही कोरडा पडला आहे. यामुळे शासनाने लाखो रुपये खर्च करुनही शेतकऱ्यांना लाभ होत नसल्याचे चित्र आहे.एकीकडे शासन स्तरावर विविध योजनाच्या माध्यमातून सिंचनाच्या सोई उपलब्ध करून देण्यासाठी आटापिटा करत असताना उपलब्ध बंधारे नियोजनाअभावी कोरडे पडले आहेत. यातून शासनाच्या उद्देशाला तडा देण्याचे काम होत आहे. विश्वगंगा नदीवर पाणी अडवून परीसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी तीन वषार्पासून या नदीवर बंधाराचे बांधकाम करण्यात आले आहे. मागील वर्षीच हा बंधारा पूर्ण झालेला आहे. या बंधाऱ्यात पाट्या टाकून पाणी अडविने आवश्यक आहे. शासकीय धोरणानुसार बंधारा पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीने किंवा गावातील पाणी वापर संस्थाने सदरचा बंधारा ताब्यात घेऊन त्याची देखभाल करणे आवश्यक ठरते. यासाठी गावातीलच ग्रामपंचायतीने किंवा पानीवापर संस्थने पुढाकार घेवून सदर बंधारा वापरात आणने गरजेचे असताना सुध्दा अजुनही याविषयी कोणीही गंभीर नसल्याचे चित्र आहे. शेकडो एकर शेती सिंचनापासुन वंचितया बंधारामुळे परीसरातील शेकडो एकर शेतीला जलसिंचनाखाली येणार आहे. परीसरातील विहरीची जलपातळीत यामुळे वाढ होणार आहे. परंतु या बंधारात पाणी न अडविल्याने शेकडो एकर शेती सिंचनापासुन वंचीत राहणार आहे.