शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव-सप्तश्रुंगी बसचे ब्रेक निकामी; चालक-वाहकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2023 14:47 IST

खामगाव आगाराची बस क्रमांक एमएच-४०, वाय-५९०२ ही गाडी मलकापुरातून पुढे जाण्यासाठी निघाली

अनिल गोठी

मलकापूर (बुलढाणा) : खामगाव आगारातून सप्तश्रुंगीकडे जाणाऱ्या बसचे मलकापूर शहरातील महावीर चौकात ब्रेक निकामी झाले. यावेळी चालक-वाहकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रित केली. तसेच रस्त्याच्या कडेला लावण्यात आली. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांसह बसमधील प्रवाशांचा धोका टळला.

खामगाव आगाराची बस क्रमांक एमएच-४०, वाय-५९०२ ही गाडी मलकापुरातून पुढे जाण्यासाठी निघाली. त्यावेळी महावीर भवन चौकात ट्रक आला. त्यामुळे चालकाने ब्रेक दाबला. मात्र, बस थांबली नाही. ही बाब चालक अमोल केणेकर यांनी तातडीने वाहक कमल वाघ यांना सांगितली. वाहकाने तातडीने चालत्या गाडीतून खाली उडी घेतली. तसेच बसच्या पुढील चाकासमोर मोठा दगड ठेवला. त्यामुळे बस थांबली. बसमधील ३५ प्रवासी खाली उतरले. चालकाने घटनेची माहिती मलकापूर आगार व्यवस्थापक मुकुंद न्हावकर यांना दिली. बसची दुरुस्ती करून आगारात आणण्यात आली.

सप्तश्रुंगी बसचा झाला होता अपघातखामगाव आगाराची सप्तश्रुंगी येथे गेलेली बस परतीच्या प्रवासात असताना १२ जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात डोंगरकड्यात असलेल्या रस्त्याखाली घसरली होती. ती काही दिवसांपूर्वीच काढण्यात आली. त्यानंतर आता सप्तश्रुंगीकडे जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने खामगाव आगारातील बसची अवस्था कशी आहे, हे अधोरेखित झाले आहे.

टॅग्स :state transportएसटी