दोन चिमुकल्यांसह विवाहीतेचा मृतदेह विहीरीत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 04:27 PM2020-05-19T16:27:19+5:302020-05-19T16:27:36+5:30

दोन चिमुकल्यांसह एका महिलेचा मृतदहे विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  

The body of the married woman along with two childrens was found in the well | दोन चिमुकल्यांसह विवाहीतेचा मृतदेह विहीरीत आढळला

दोन चिमुकल्यांसह विवाहीतेचा मृतदेह विहीरीत आढळला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दुसरबीड:सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथे एका विहीरीत दोन चिमुकल्यांसह एका महिलेचा मृतदहे विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  १९ मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.
दरम्यान, प्राथमिक माहितीच्या आधारावर किनगाव राजा पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली असून मृतांचे पार्थिव हे सिंदखेड राजा येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
मृत महिला व तिचे ११ व नऊ वर्षीय मुलगा गणेश आणि मुलगी मयुरी हे १७ मे पासून बेपत्ता होते. ते दुसरबीड येथील रहिवाशी आहेत. १७ मे रोजी स्वाती अमोल जगदाळे (२८) हीने मध्यरात्री दरम्यान मुलगा गणेश व मुलगी मयुरी यांना शौचासाठी घरातून बाहेर नेले होते. बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत. त्यामुळे स्वाती जगदाळेच्या कुटुंबियांनी त्यांचा रात्रभर शोध घेतला परंतू ते सापडले नाहीत. १८ मे रोजीही परिसरात कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नाही. दरम्यान १९ मे रोजी  सकाळी साडेसहाच्या सुमारास दुसरबीड गावानजीक मेहकर मार्गाला लागून असलेल्या एका सार्वजनिक विहिरीत तिघांचेही मृतदेह आढळून आले.  याची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर किनगाव राजा पोलिसांनीही घटनास्थळ गाठून पंचनामा करत तिघांचेही पार्थिव सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत.
प्रकरणी मृत महिलेचा पती अमोल भगवान जाधव याने किनगाव राजा पोलिसांत तक्रार दिली असून त्यावरून पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारावर आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: The body of the married woman along with two childrens was found in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.