शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीसह मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 15:01 IST

२० वर्षीय मुलगा व अल्पवयीन मुलीचा मृतदेह गुरुवारी सकाळी पार्डा दराडे शिवारातील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देअजिसपूर येथील सचिन मधूकर साळवे (२०) मजुरीचे काम करीत होता. अल्पवयीन मुलगी गावातील जिल्हा परिषद शाळेत सातवीत शिकत होती.

देऊळगाव कुंडपाळ : अजिसपूर येथील २० वर्षीय मुलगा व अल्पवयीन मुलीचा मृतदेह गुरुवारी सकाळी पार्डा दराडे शिवारातील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान अल्पवयीन मुलीच्या वडिलाने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार बुधवारी लोणार पोलिस स्टेशनला नोंदवली असल्याची माहिती मिळाली. अजिसपूर येथील सचिन मधूकर साळवे (२०) मजुरीचे काम करीत होता. तर अल्पवयीन मुलगी गावातील जिल्हा परिषद शाळेत सातवीत शिकत होती. बुधवारी गावातील काही जणांनी त्यांनी शेतात फिरतांना बघितले होते. कुठे जात आहात, अशी विचारणाही केली होती. दरम्यान गुरुवारी सकाळी पार्डा दराडे येथील उद्धव दराडे शेतातील विहिरीवर मोटारपंप सुरु करण्यासाठी गेल्यावर त्यांना विहिरीच्या काठावर चप्पल, बुट, ओढणी दिसून आली. त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी लगेच लोणार पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलिस कॉन्स्टेबल झोटे, बोरे, निकम, पवार  घटनास्थळी दाखल झाले. विहिरीची पाहणी करुन मृतदेह बाहेर काढण्यात आले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणार येथे पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी