शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता चुलत बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 20:43 IST

दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मेहकर तालुक्यातील पारडा येथील दोन चुलत बहिणींचे मृतदेह चौंढी शिवारातील एका विहीरीत २५ मार्च रोजी आढळून आले आहेत.

मेहकर : दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मेहकर तालुक्यातील पारडा येथील दोन चुलत बहिणींचे मृतदेह चौंढी शिवारातील एका विहीरीत २५ मार्च रोजी आढळून आले आहेत. प्रकरणी माजी पोलिस पाटील रामदास कावरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त होत असून पोलिसांनी जलदगतीने प्रकरणाचा तपास सुरूकेला आहे.पारडा येथील सिमा जगन्नाथ पवार (१६) आणि करीना मोहन पवार (८)) दोघी चुलत बहिणी दोन दिवसापूर्वी शेळ््या चारण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्या सायंकाळी घरी परत आल्याच नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला होता मात्र त्या सापडल्या नाही. चौढी शिवारात दत्ता सखाराम कावरे यांच्या विहिरीमध्ये सिमा आणि करीना यांचे मृतदेह असल्याचे २५ मार्च रेजी उघडकीस आले. करीना ही पारडा येथे दुसर्या वर्गात शिकत होती. या दोन्ही मुली विहिरीत कशा पडल्या ही बाब स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे घातपाताचा संशयव्यक्त होत असून त्याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.  प्रकरणाचा तपास ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, पंढरीनाथ गिते  करीत आहेत. पोलिसांनी प्रकरणी आकस्मिकमृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन करण्यात अडचणदोन्ही मुलींचे मृतदेह जवळपास दोन दिवस विहीरीत असल्याने मेहकर येथे शवविच्छेदन करण्यात अडचण येत होती. त्यामुळे हे दोन्ही मृतदेह अकोला येथे पाठविण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर हा प्रकार नेमका कसा घडला याची माहिती मिळण्याचा पोलिसांना अंदाज आहे.