शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गासाठी ब्लास्टींग; शेतकऱ्यांच्या  सिंचन साहित्याचे हाेतेय नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 11:55 IST

Samruddhi Mahamarg News ब्लास्टिंगमुळे उडालेले दगड लागत असल्याने पाइपलाइन फुटत असून नाेझलचेही नुकसान हाेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकरःसमृद्धी महामार्गासाठी हाेत असलेल्या ब्लास्टिंगमुळे शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याचे नुकसान हाेत आहे. ब्लास्टिंगमुळे उडालेले दगड लागत असल्याने पाइपलाइन फुटत असून नाेझलचेही नुकसान हाेत आहे. त्यामुळे या महामार्गालगत शेती असलेले शेतकरी त्रस्त झाले आहेत.  समृद्धी महामार्गमेहकर तालुक्यातून जात असून शिवपुरी शिवारात मोठ्या प्रमाणात रस्ता खोदण्याचे काम सुरू आहे. सदर काम करत असताना कंपनीकडून रस्त्यामध्ये खडक फोडण्यासाठी   ब्लास्टिंग करण्यात येत आहे.सदर ब्लास्टिंग केल्यामुळे खडक तर फोडले जात आहे;मात्र फोडलेला खडक व त्याचे छोटे छोटे दगड  शेतकऱ्यांच्या शेतात असलेले तुषार सिंचनचे पाईप व नोझल फुटत आहे.यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.  समृद्धी महामार्गाचा  रस्ता करीत असताना काही ठिकाणी हा रस्ता खूप खोल खोदण्यात येत आहे. यामुळे या रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळी  सुद्धा कमी होत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी कमी पडत आहे. काही ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करत असल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी असलेल्या पाईपलाईन फुटल्या आहेत. सदर पाईपलाईन जोडण्याकडे सुद्धा कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यावर संक्रांत येत आहे. 

साेयाबीनच्या नुकसानाकडे दुर्लक्षया समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खडक टाकण्यासाठी कंपनीचे वाहने रात्रंदिवस धावत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ निर्माण होत असून या धुळीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. सध्या सर्व्हे सुरू आहे. मात्र तो फक्त रब्बी हंगामाच्या पिके त्यामध्ये घेत असल्याने सोयाबीन या पिकांचे सुद्धा त्या नुकसान यामध्ये समावेश करावा अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे.

माझी शेती समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला आहे. या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग घेत असल्याने माझ्या तुषार सिंचन पाईपचे व नोझलचे नुकसान होत आहे. सदर नुकसान कंपनीने भरून द्यावे याबाबत कंपनीकडे वारंवार मागणी केली आहे ; मात्र माझ्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. - समाधान शेषराव सुरुशे, शेतकरी, शिवपुरी

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMehkarमेहकरFarmerशेतकरी