शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे संकटमोचक आमच्यातून निघून गेले : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 19:24 IST

कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, देशाचे खंबीर नेतृत्व तसेच भाजपाचे संकटमोचक आज आपल्यातून काळाच्या पडद्याआड गेले.

खामगाव: कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, देशाचे खंबीर नेतृत्व तसेच भाजपाचे संकटमोचक आज आपल्यातून काळाच्या पडद्याआड गेले. एक मुत्सद्दी राजकारणी हरपल्याने संपूर्ण देशवासीयांना दुःख झाले आहे. अशा प्रकारच्या शोक संवेदना व्यक्त करीत राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आदरांजली अर्पण केली. राज्यातील पूर परिस्थिती व माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे ७ ऑगस्ट रोजीची महाजनादेश यात्रा तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी भाजपाची ही महाजनादेश यात्रा खान्देशातून मलकापुरात शनिवारी सकाळी दाखल झाली. माजी केंद्रीय अर्थमंत्री स्व. अरुण जेटली यांच्या दु:खद निधनामुळे आजच्या महाजनादेश यात्रे निमित्त आयोजित सभेचे शोकसभेत रूपांतर झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी केंद्रीय मंत्री स्व. अरुण जेटली यांच्या दु:खद निधनामुळे जनादेश यात्रेला स्थगिती दिल्याचे सांगत अरुण जेटली यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकीत आदरांजलीपर भावना व्यक्त केल्या.दहा मिनिटातच सभा आटोपती घेण्यात आली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मलकापूरचे वीर जवान स्वर्गीय संजयसिंह राजपूत यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर खामगाव येथे मुख्यमंत्री २.३० वाजता दाखल झाले. त्याठिकाणी मोटारसायकल रॅलीसोबत ते खामगाव येथील न.प. मैदानावर पोहचले. याठिकाणी सुद्धा अरुण जेटलींना भावपूर्ण श्रद्घांजली अर्पण करीत त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यानंतर शेगाव येथील शोक सभेसाठी ते निघाले. शेगाव येथे पोहचल्यानंतर त्यांनी प्रथम गजानन महाराजांच्या समाधीचे दर्श़न घेतले. याठिकाणी संस्थानचे विश्वस्त निळकंठ पाटील यांनी त्यांचे स्वागत करीत पूर ग्रस्तांचा निधी सुपूर्द केला. यानंतर कॉटन मार्केटमध्ये शोक सभा पार पडली. या सभेला केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, ना. रणजित पाटील, ना. गिरीश महाजन, ना. संजय कुटे, ना. चैनसुख संचेती, आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष धुपतराव सावळे, जि. प. अध्यक्ष सौ. उमाताई तायडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस