वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर भाजप गप्प - वामनराव चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:30 AM2018-01-26T00:30:37+5:302018-01-26T00:31:42+5:30

बुलडाणा : वेगळ्य़ा विदर्भाच्या मुद्द्यावर भाजपच्या काही नेत्यांनी आमच्या सोबत आंदोलने केली. निवडणुकीत हा मुद्दा बनवला होता. मात्र आता या मुद्यावर भाजप सोयीस्करपणे गप्प आहे. परंतू वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव चटप यांनी येथे केले.

BJP's silence on the issue of separate Vidarbha - Vamanrao Chatap | वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर भाजप गप्प - वामनराव चटप

वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर भाजप गप्प - वामनराव चटप

googlenewsNext
ठळक मुद्देबुलडाण्यात गुरुवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेत चटप यांचा भाजपला टोला

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : वेगळ्य़ा विदर्भाच्या मुद्द्यावर भाजपच्या काही नेत्यांनी आमच्या सोबत आंदोलने केली. निवडणुकीत हा मुद्दा बनवला होता. मात्र आता या मुद्यावर भाजप सोयीस्करपणे गप्प आहे. परंतू वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव चटप यांनी येथे केले.
गुरूवारी बुलडाणा येथील पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी राम नवले, बार कॉन्सीलचे अध्यक्ष राज देवकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर चेके पाटील, सुरेश वानखेड, दामोदर शर्मा, बाबुराव नरोटे, रंजना मार्मडे, नामदेवराव जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना वामनराव चटप म्हणाले की २८ सप्टेंबर १९५३ राजी नागपूर कररा झाला होता. विदर्भाला त्यावेळी महाराष्ट्रात जनतेची संमती न घेता सामिल केले होते. तेव्हापासून विदर्भावर अन्याय होत आहे. या करारानुसार २३ टक्के नोकर्या वैदर्भीय तरुणांना देणे आवश्यक होते. 
पंरतू प्रत्यक्षात आठ टक्केच दिल्या गेल्या. पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक दिल्या गेल्या. यासह अन्य मुद्द्यांचा वामनराव  चटप यांनी उहापोह केला. सरकाली तिजोरीतील एक लाख कोटी रुपये विदर्भाच्या वाट्याचे असताना  पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी ते पळविले म्हणून विदर्भात शेती सिंचनाचा अनुशेष आहे. केवळ १७ टक्केच शेती ओलितीखाली आली आहे. कोल्पापूरमध्ये ते प्रमाण ९५ टक्के आहे. पुण्यात १00 टक्के आहे. पश्‍चिम महाराष्ट्र हिरवागार तर विदर्भ कोरडा अशी स्थिती निर्माण झाली आहे. १८ हजार किमी रस्त्यांचाही अनुशेष आहे. त्याचेही ५0 हजार कोटी रुपये पश्‍चिम महाराष्ट्राने पळवल्याचे ते म्हणाले. प्रत्येक मुद्द्यावर उहापोह करून त्यांनी महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नसल्याची भूमिका या पत्रकार परिषदेत मांडली. वीज प्रश्नाचाही मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

Web Title: BJP's silence on the issue of separate Vidarbha - Vamanrao Chatap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.