शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:07 IST

जिल्ह्यातील काही तुल्यबळ मोहरे गळा लावण्याचे प्रयत्न होत असून भाजपनेही एक प्रकारे मिशन बिगीन अनेक सुरू केल्याचे चित्र आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आगामी काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून त्यानुषंगाने भाजपने पक्षांतर्गत पायाभरणीस प्रारंभ केला असून आगामी एक ते दीड वर्षाच्या काळात त्यानुषंगाने जिल्ह्यातील काही तुल्यबळ मोहरे गळा लावण्याचे प्रयत्न होत असून भाजपनेही एक प्रकारे मिशन बिगीन अनेक सुरू केल्याचे चित्र आहे.गेल्या काही दिवसामधील राजकीय घडामोडी पाहता भाजपचे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. त्यातच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील काही संस्था, बाजार समित्यांच्याही आगामी काळात निवडणुका होऊ घातल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना तुर्तास विराम देण्यात आला असला तरी कोरोनाच्या संसर्गाच्या काळात लॉकडाऊन नंतर मिशन बिगीन प्रारंभ झाले असून भाजपनेही राजकीय खेळी करत पक्षात तुल्यबल राजकीय नेत्यांच्या प्रवेशास प्रारंभ केला आहे. या निमित्त ठरले ते शिवसेना व्हाया वंचित बहुजन आघाडी असा प्रवास करत बुलडाण्याचे तीन वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्व केले माजी आ. विजयराज शिंदे यांच्या भाजप प्रवेशाचे.मात्र या काळात पक्ष संघटन वाढविण्याच्या दृष्टीने भाजपने राजकीय खेळ््या जिल्हयात सुरू केल्या आहे. २०१९ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले व तीनदा आमदार राहलेले विजयराज शिंदे यांच्या रुपाने भाजपने बुलडाण्यात एक तुल्यबळ व्यक्ती गळाला लावला आहे. मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय कुटे व जिल्ह्यातील आमदारांच्या उपस्थितीत माजी आ. विजयराज शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न भाजप करीत असावी असा जाणकारांचा होरा आहे. या माध्यमातून भाजप आणि माजी आ. विजयराज शिंदे यांचेही मिशन बिगीन अगेन सुरू झाल्याचे चित्र आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाbuldhanaबुलडाणा