ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत भाजप स्वस्त बसणार नाही- गोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:43 IST2021-09-16T04:43:05+5:302021-09-16T04:43:05+5:30

भाजपचे बुलडाणा जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथे हे निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जोपर्यंत ओबीसींचे राजकीय ...

BJP will not be cheap till OBCs get political reservation- Gode | ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत भाजप स्वस्त बसणार नाही- गोडे

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत भाजप स्वस्त बसणार नाही- गोडे

भाजपचे बुलडाणा जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथे हे निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही, असे जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांनी यावेळी स्पष्ट केले. बुलडाण्यात झालेल्या या आंदोलनामध्ये भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आघाडी सरकारचा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.

या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष विजया राठी, शहर सरचिटणीस विवेक गिऱ्हे, आशिष व्यवहारे, शहर उपाध्यक्ष हर्षल जोशी, नारायण तोंडीलायता, पंडितराव सपकाळ, नितीन बेंडवाल, आसिफ भाई, नगरसेवक अरविंद होंडे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मंदार बाहेकर, पद्मनाभ बाहेकर, चंद्रकांत पाथरकर, प्रकाश शेळके, सचिन जोशी, नितीन श्रीवास, सोहम झाल्टे, मोहित भंडारी, नगरसेविका सुभद्रा इंगळे, रंजना पवार, वर्षा पाथरकर, उषा पवार, प्रकाश पवार, अमानुल्ला खान, शंतनू आमले, धीरज जाधव, शुभम भोंडे, राजेश देशमुख यांच्यासह अन्य सहभागी झाले होते.

Web Title: BJP will not be cheap till OBCs get political reservation- Gode