शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाने दुचाकीला चिरडले; एक ठार, एक गंभीर

By सदानंद सिरसाट | Updated: December 18, 2023 22:50 IST

अज्ञात वाहनाने दुचाकीला चिरडल्याची घटना सोमवारी रात्री ९.३० वाजता घडली

सदानंद सिरसाट, मलकापूर (बुलढाणा): नांदुरा रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलानजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला चिरडल्याची घटना सोमवारी रात्री ९.३० वाजता घडली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शहरातील गाडेगाव मोहल्ल्यातील रहिवासी वीरेंद्रसिंह संग्रामसिंह राठोर (४०), योगेश रवींद्र टप (२५) हे दोन्ही इलेक्ट्रॉनिक दुचाकीने शहरात प्रवेश करण्याच्या मार्गावर होते. राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलानजीक मलकापूर शहरात येणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला चिरडले. अपघात एवढा गंभीर स्वरूपात घडला की त्यात अज्ञात वाहनाने अक्षरशः पाचशे फुटांपर्यंत दुचाकी फरफटत नेली अन् पोबारा केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेत वीरेंद्रसिंह संग्रामसिंह राठोर याचा जागीच मृत्यू झाल्याने त्याला शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, तर गंभीर जखमी योगेश टप याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. ही घटना घडल्यानंतर गाडेगाव मोहल्ल्यातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली होती. पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात