अनिल उंबरकरशेगाव (बुलढाणा) : खासदार राहुल गांधी यांनी श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. तत्पूर्वी श्री संस्थानमध्ये सनई चौघड्याचे मंगलवाद्यात, टाळ-मृदंगाच्या निनादात सेवकांचे हस्ते धार्मिक परंपरेनुसार त्यांचे स्वागत करण्यात आले.संस्थानचे सेवक व्यवस्थापकीय विश्वस्त निळकंठदादा पाटील यांच्याकडून श्री संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेतली. राहुल गांधी यांनी श्री संस्थानच्या कार्याची प्रशंसा केली. दर्शन घेतेवेळी राहुल गांधी यांनी श्री जय गजाननचा गजर केला़.
Bharat jodo Yatra: राहुल गांधी श्री गजानन महाराज चरणी नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 05:56 IST