शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ १० सप्टेंबर रोजी 'भारत बंद'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 12:28 IST

खामगाव : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने १० सप्टेंबररोजी भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे.

 

खामगाव : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने १० सप्टेंबररोजी भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या बंदमध्ये व्यापारी बंधूंनी सहभाग दर्शवून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावीत असे आवाहन खामगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलिपकुमार सानंदा यांनी केले आहे. सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जिवनावर थेट परिणाम करणाºया, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होऊन इंधन दरवाढीने उच्चांक गाठला आहे. या भाववाढीमुळे शेतकरी, शेतमजुर, व्यापारी व सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असुन जनतेच्या त्रासात दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. या व अशा शासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे जनता अधिकच त्रस्त झाली आहे. एकीकडे जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्ता हस्तगत करायची व त्याच जनतेला इंधन दरवाढ करुन त्यांचे जगणे महाकठीण करायचे. या दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये सवलत देण्यास स्पष्ट नकार द्यायचा हे तर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने झालेल्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याच प्रकार असल्याचा आरोप दिलिपकुमार सानंदा यांनी केला आहे. भारतीय राष्ट्रीय  काँग्रेस पक्षाच्या वतीने  सरकारच्या जनविरोधी कार्यपद्धतीचा निषेध नोंदविण्यासाठी व अन्यायकारक रितीने केलेली भाववाढ तातडीने कमी करण्यात यावी ही प्रमुख मागणी घेवून १० सप्टेंबरला भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेने या बंदमध्ये सामील होऊन स्वयंस्फुतीर्ने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवावी व या सर्वसामान्यांच्या हितास्तव असलेल्या भारत बंदला सहकार्य करावे असे आवाहन सानंदा यांनी केले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावcongressकाँग्रेस