शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

चार दशके गुणवान खेळाडू घडविणारे ‘भगत गुरूजी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 11:36 IST

बुलडाण्याच्या जिल्हा परिषद हायस्कूलचे नाव त्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने थेट राज्यस्तरावर नेले

बुलडाणा: राज्यात क्रीडा क्षेत्रात बुलडाण्याचे नाव उंचावण्यामध्ये तब्बल चार दशके महत्त्वाचे योगदान बुलडाणा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधून सेवानिवृत्त झालेले जे. बी. भगत यांनी दिले आहे.बुलडाण्याच्या जिल्हा परिषद हायस्कूलचे नाव त्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने थेट राज्यस्तरावर नेले. ऐवढेच नव्हे तर पोलिस दलाचा १९९० च्या दशकातील कबड्डीचा संघ घडविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगादन राहले. या संघाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर आॅल इंडिया टुर्नामेंटमध्ये बुलडाण्याच्या पोलिस संघाने नंतर कधी मागे वळून पाहले नाही. पोलिस, महावितरण, राज्य परिवहन महामंडळातील अनेक गुणवान खेळाडू त्यांनी घडविले आहे. बुलडाण्याचे कुस्तीपटू तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त टी.ए. सोर यांना घडविण्यामध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. १९६० ते २००० दरम्यान क्रीडा क्षेत्रात त्यांच्या मार्गदर्शनामुळे शालेय तथा पोलिस विभागाच्या स्पर्धांमध्ये बुलडाण्याचा दबदबा राहला आहे. अ‍ॅथलेटीक्समध्येही बुलडाण्याला राज्यस्तरावर पहिले सुवर्ण पदक त्यांनी घडविलेल्या संजय चिटवारच्या रुपाने मिळाले. त्यानंतर १९८० दशकापासून अ‍ॅथलेटीक्स, टेबल टेनीस, कुस्ती, थ्रो बॉल, लंगर छाप उडी (ट्रीपल जंप), बॅडमिंटन खेळामध्ये त्यांनी बुलडाण्याला गुणवान खेळाडू मिळवून दिले.शिस्तप्रिय भगत गुरूजी खेळाडूची बारकाईने पाहणी करून त्याी देहबोली, खेळतानाचे त्याचे पदलालित्य बघूनच त्याच्यातील गुणवत्ता ओळखत. क्रीडा दिनानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी जुन्या गोष्टींचा उजाळा दिला. खेळामध्ये आता पुर्वीचे अ‍ॅम्युचर (हौशीपणा) हरवला. पूर्वी सुविधांची कमतरता होती. मात्र आता शारीरिक मेहनतीकडे दुर्लक्ष होत आहे. सोबतच शाळेतील शेवटचा क्लास हा खेळासाठी दिला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. क्रीडा क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी स्व: खर्चातून बंगळुरू येथे जावून एनआयएस केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक