देऊळगावराजा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील ग्राम खल्याळगव्हाण येथे २ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान भरदिवसा घरफोडी झाल्याचा प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की, गव्हाण येथील हरिभाऊ रामचंद्र पोंधे घरी नसताना त्यांची मुलगी चक्कीमध्ये दळण आणण्यासाठी गेली होती. ही संधी साधून दोन अज्ञात चोरटे दुचाकीवरुन आलेत. त्यांनी घरामध्ये प्रवेश करून रोख रक्कम २५ हजार व सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण ५७,४00 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. मुलीच्या लक्षात सदर प्रकार आल्याने तिने वडिलांना फोन करून सांगितले. याचवेळी गावामध्ये दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याचे गावकरी सांगत आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्यामराव दिघावकर, गुन्हे शाखेचे सूर्यकांत बांगर तथा पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अंबादास हिवाळे यांनी नाकाबंदी करुन सहायक पोलीस निरीक्षक जुनघरे यांच्या नेतृत्वात एक पथक परवाना केले. दरम्यान, या पथकाने मेरा बु. जवळ एका आरोपीला ताब्यात घेतले असून, दोन आरोपी फरार झाले आहेत. अधिक तपास ठाणेदार अंबादास हिवाळे करीत आहेत.
भरदिवसा घरफोडी
By admin | Updated: February 3, 2015 00:11 IST