शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ४०० शाळांची आज घंटा वाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:04 IST

School of Buldhana ६७५ शाळांपैकी जवळपास ४०० शाळा सुरू होण्याचे संकेत सुत्रांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  सोमवारपासून बुलडाणा जिल्हयातील ६७५ शाळांपैकी जवळपास ४०० शाळा सुरू होण्याचे संकेत सुत्रांनी दिले असून ६०५० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी रविवारपर्यंत ३५०० जणांचे अहवाल प्राप्त झाले आहे. यातील ५६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. दरम्यान, अद्यापही उर्वरित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अहवाल मिळण्यास किमान दोन दिवस लागण्याची शक्यता पाहता जिल्ह्यातील शाळा या टप्प्या टप्प्याने सुरू होतील, असे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.ज्या शाळांमधील शिक्षकांचे आरटीपीसीआरचे रिपोर्ट प्राप्त झाले त्या शाळा सोमवारी उघडतील. पण ज्या शाळांमधील शिक्षकांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत त्यांना शासनाच्या निर्देशानुसार साळेत जाण्यास परवानगी नसल्याने त्या साळा एक किंवा दोन दिवस उशिरा उघडणार आहेत. शासनाने अत्यंत सुस्पष्ट अशा सविस्तर मार्गदर्शक सुचना १० नोव्हेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार दिलेल्या आहेत. त्या परिपत्रकानुसारच जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा आदेश काढलेला आहे. परिणामी एकंदरीत परिस्थिती पाहता जिल्ह्यातील बहुतांश शाळा या  चालू आठवड्यात उघडतील, असे संकेतच सुत्रांनी दिले आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहता सोमवारी जवळपास ४०० शाळा सुरू होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली. मात्र नियमित स्वरुपात शाळा सुरळीत हाेण्यासाठी एक आठवडा लागू शकतो.  जिल्ह्यातील ९८ टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. आता पर्यंत यातील ५६ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षकांची संख्या कमी आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. अशा शिक्षकांना तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत न जाता उपचार घ्यावे लागणार आहेत. त्यानंतरच पुढे विहीत कालवधी संपल्यानंतर वैद्यकीय प्रमामपत्र घेवूनच त्यांना शाळेवर रुजू होता येईल.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा