शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अस्वल, निलगायींचा ज्ञानगंगा अभयारण्यात स्वच्छंद विहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 17:03 IST

५४ कृत्रिम पाणवठ्यावर स्वच्छंदपणे बागडत असून अस्वलही आपल्या पिल्लासह पाण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.

ठळक मुद्दे उन्हाच्या काहिलीत अस्वलांची पाण्यात मस्ती; निलगायीही घेताहेत आनंद.ज्ञानगंगातील काही प्रमाणात असलेला माणसांचा वापर कमी झाला आहे. बिनदिक्कतपणे हे वन्यजीव सध्या पाणवठ्यावर तृष्णातृप्ती करत आहे.

बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाउन असल्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाºया  २५ किमी लांबीच्या रस्त्यावरही वाहनांची वर्दळ आता बंद झाली आहे. परिणामी चक्क दिवसाच आता प्राणी अभयारण्यातील ५४ कृत्रिम पाणवठ्यावर स्वच्छंदपणे बागडत असून अस्वलही आपल्या पिल्लासह पाण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहे. नाही म्हणायला सध्या बुलडाणा जिल्ह्यातील तापमापीचा पारा हा ४० अंश सेल्सिअस पार गेला आहे. अशा स्थितीत होणाºया काहीलीपासून बचाववासाठी वन्यप्राण्यांना अभयारण्यातील कृत्रीम पाणवठ्याचा आधार मिळत आहे.बुलडाणा, चिखली, मोताळा आणि खामगाव या चार तालुक्यांच्या सिमेवर सुमारे २२० चौ.किमी विस्तार असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात सध्या सर्रासपणे वन्यप्राणी रस्त्यालगतच्या पाणवठ्यावर बिनधास्तपणे वावर करत आहे. टीपेश्वरमधून आलेल्या टी-१ सी-१ वाघामुळे ज्ञानगंगा अभयारण्य प्रसिद्धीच्या झोतात आले असले तरी अस्वलांसाठी हे अभयारण्य तसे प्रसिद्ध आहे. त्यामुळे साधारणत: पाणवठ्यावर अस्वलांचा वावर अधिकच दिसतो. त्यापाठोपाठ नील गाय, मोरांचीही पाणवठ्यावर मस्ती सुरू असल्याचे दिसून येत आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात सध्या ५४ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून या पाणवठ्यावर हे प्राणी स्वच्छंदपणे बागडत आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांनाही त्याची लागन होऊ नये म्हणून ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसरात असलेल्या गावांमध्येही जागृती करण्यात आली आहे. गाईड असलेल्या १४ जणांनाही धान्यचे वन्यजीव विभागाकडून  वितरण करण्यात आल्यामुळे तसाही ज्ञानगंगातील काही प्रमाणात असलेला माणसांचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे बिनदिक्कतपणे हे वन्यजीव सध्या पाणवठ्यावर तृष्णातृप्ती करत आहे.

 २० ट्रॅप कॅमेरे ज्ञानगंगा अभयारण्यात जवळपास २० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून या कॅमेºयामध्ये पहाटे, दुपारी व सायंकाळदरम्यान हे वन्यजीव पाणवठ्यावर वावरताना टिपल्या गेले आहेत.

टॅग्स :dnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यwildlifeवन्यजीवbuldhanaबुलडाणा