लिहित्या, वाचत्या, विचारकर्त्या व्हा : नीरजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 04:01 PM2019-08-26T16:01:24+5:302019-08-26T16:01:34+5:30

राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या

Be Writer, Reader, Thinker: Neerja | लिहित्या, वाचत्या, विचारकर्त्या व्हा : नीरजा

लिहित्या, वाचत्या, विचारकर्त्या व्हा : नीरजा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: ‘‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, तर आपल्या जगण्याचा विचार, आत्मभान जगवण्याचा मार्ग, स्वत: ची स्वप्नं मनापासून जगण्याचा मार्ग आहे. स्वातंत्र्य म्हणजे आपल्यातील व्यक्ती शोधणे, स्वत्व शोधणे आहे. ते शोधा आणि लिहित्या, वाचत्या विचारकर्त्या व्हा’’, असे आवाहन मुंबई येथील कवयित्री, लेखिका नीरजा यांनी केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि प्रगती सार्वजनिक वाचनालय बुलडाणा यांच्या पुढाकाराने २५ आॅगस्ट रोजी आयोजित राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. शहरातील गर्दे वाचनालय सभागृहातील ताराबाई शिंदे साहित्यनगरीत संमेलनाचा एकदिवशीय दिमाखदार सोहळा विविध सत्रांमध्ये पार पडला. यावेळी नीरजा यांनी ५० मिनीटांच्या भाषणात विविध विषयांना हात घातल व्यवस्थेने आपल्यावर सोपविलेल्या चुकीच्या परंपरा फोडून त्यातून बाहेर पडा व पुरुषी व्यवस्थेत आपल्या जगण्याला अर्थ द्या, असे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले.
यावेळी स्वागताध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या प्रभाताई चिंचोले, नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद, अहमदनगर येथील दिशा पिंकी शेख, मुंबई येथील ज्योती आंबेकर आदींसह साहित्यिक, साहित्यप्रेमी रसिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ग्रंथदिंडी व उद्घाटनासह विविध सहा सत्रांमध्ये हा सोहळा पार पडला. बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळसह राज्यातील अनेक भागातून महिला लेखिका, कवयित्रींचा मेळा या संमेलनासाठी जमला होता. संमेलनाचे संयोजन नरेंद्र लांजेवार व कार्यकारिणीच्या सदस्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. संमेलनाचे उद्घाटन ही लक्षवेधी ठरले.

Web Title: Be Writer, Reader, Thinker: Neerja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.