शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

साठा करण्यास जागा नसल्याने कापूस खरेदीस अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:07 IST

शासनाच्या दिरंगाईमुळे सिसीआय केंद्रावरच शेतकºयांची तारांबळ उडत असल्याचे दिसून येते.

योगेश फरपट / मनोज पाटीललोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, शेतकऱ्यांना अडचण जावू नये म्हणून शासनाने सीसीआय केंद्र सुरु केले. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सिसीआय केंद्रावरच शेतकºयांची तारांबळ उडत असल्याचे दिसून येते.बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, मलकापूर, चिखली या ठिकाणी सीसीआय केंद्र सुरु करण्यात आले. पाऊस चांगला झाल्याने सर्वत्रच कापसाचे उत्पादनही चांगले झाले. आॅक्टोबर महिन्यापासून याठिकाणी कापूस खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र दोन महिन्यातच सीसीआय केंद्रावर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा कापूस छुप्या मार्गाने विकल्या जावू लागला. यामुळे मलकापूरसह इतर केंद्रावर शेतकºयांनी तिव्र रोष व्यक्त केला. आतातर कापूस खरेदी केंद्रांवर खरेदी जास्त झाल्याने, सरकी पडून असल्याने व गठाण साठवणूक की करीता जागा नसल्याच्या कारणास्तव १५ ते १७ फेब्रुवारीपर्यंत दिवस शासकीय कापूस खरेदी बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान कापूस खरेदी केंद्र बंद होती काय अशी अनेकांना भिती लागली आहे. कापूस खरेदी केंद्रांवर कापसाची आवक वाढली असून दररोज या शासकीय कापूस खरेदी केंद्रासमोर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे या वाहनातून शासकीय खरेदी केंद्रांवर विक्री केला जाणारा कापूस हा व्यापा?्यांचा असून तो मात्र शेतक?्यांच्या नावावर दिवसाढवळ्या विक्री केल्या जात आहे. ही बाब सर्वश्रुत असूनही संबंधित यंत्रणा या बाबीकडे अगदी प्रारंभी पासूनच कानाडोळा करीत आहे हे विशेष!

मलकापूर सीसीआय केंद्रावर वाहनांच्या रांगामलकापूर: शासकीय तर दोन खासगी कापूस केंद्रांवर एकूण ३ लाख ७९ हजार ९१८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून सद्यस्थितीत शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर कापसाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने दररोज शेकडो वाहनांच्या रांगा लागत आहे. शेतकºयांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाच्या नावाने अर्थात कॉटन नगरी म्हणून मलकापूरची ओळख आहे त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कापसाची आवक राहते. शहरात आज मितीस अमित फायबर, आ़शुतोष अ‍ॅग्रो, हरिओम जिनिंग, पॅनयाशियन जिनिंग, एनसीसी गणपती जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आदी पाच शासकीय खरेदी केंद्रांवर कापूस खरेदी सुरू आहे. तर शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वी मंजीत कॉटन व जनक जिनिंग या दोन जिनिंग मध्ये खाजगी कापूस खरेदी करण्यात आली. सीसीआय अंतर्गत असलेल्या पाच शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर अद्यापपावेतो २ लाख ७० हजार ९१८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. तर खाजगी केंद्रांवर १ लाख ९ हजार क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे. खाजगी कापूस खरेदी केंद्रांवर सरासरी प्रति क्विंटल ४ हजार ९०० रुपये तर शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर ५ हजार ४४० रुपये सरासरी क्विंटल प्रमाणे दर मिळत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावMalkapurमलकापूरcottonकापूस