शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बर्फाच्छादित झाला बरमासक्ती परिसर, चिखलदऱ्यात दवबिंदूही गोठले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 11:23 IST

बर्फाच्छादित झाला बरमासक्ती परिसर

नरेंद्र जावरे चिखलदरा (अमरावती) : सततच्या वातावरणातील गारव्यामुळे विदर्भाच्या नंदनवनात कमालीची थंडी कायम आहे. तापमान ३.७ डिग्रीपर्यंत खाली उतरले असून, शुक्रवारी सकाळी ७ वाजता बरमासक्ती परिसरात दवबिंदू गोठल्याने संपूर्ण परिसर पांढराशुभ्र दिसून आला. हाच प्रकार मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील दऱ्याखोऱ्यांत होता. संक्रांतीपासून तीळ-तीळ उन्हाळ्याची चाहूल लागते. वातावरण तापायला सुरुवात होते. परंतु मागील १५ ते २० दिवसांपासून संपूर्ण विदर्भात थंडीची लाट पसरलेली आहे. पारा कमालीचा घसरत असल्याने नागरिकांचे दैनंदिन कामकाजसुद्धा खोळंबले आहे.

विदर्भात थंडीचा तडाखा दाेन दिवस राहणार नागपूर : नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात थंडीचा तडाखा कायम आहे. कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा ५ अंशाच्या घसरणीमुळे थंड लाट निर्माण झाली आहे. गाेंदिया ८.२ तर ८.४ अंश थंडीने नागपूर, वर्ध्यामध्ये लाेकांना चांगलेच गारठवले.

व्याघ्र प्रकल्पात पारा खालीnचिखलदरा पर्यटनस्थळाचा पारा चार दिवसांपासून ४ डिग्री सेल्सिअस आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित घनदाट जंगलात गारव्याने अजूनच गारठा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भीमकुंड, पंचबोल, हरिमराई सेमाडोह, माखला, कुकरू, वैराट आदी परिसरातील खोरे गारठले आहे.

औरंगाबाद @ ८.१nऔरंगाबाद : शहरात हिवाळ्यातील नीचांकी तापमानाची शुक्रवारी नोंद झाली. चिकलठाणा वेधशाळेत ८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, कडाक्याच्या थंडीने शहर गारठले आहे. एमजीएम वेधशाळेत पहाटे ५.२७ वाजता किमान तापमान ७.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले.

पहाटे ५ वाजता मॉर्निंग वाॅकला जायची सवय आहे. परंतु अलीकडे कडाक्याची थंडी असल्याने शुक्रवारी नेहमीप्रमाणे ७ वाजता दरम्यान बरमासक्ती परिसरात संपूर्ण परिसर गोठलेला आढळून आला.- मुकेश वानखडे, चिखलदरा

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनChikhaldaraचिखलदरा