शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील बँका रविवारी राहणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:25 IST

बुलडाणा: आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस ३१ मार्च रविवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आला आहे. परंतू बँकामधील सरसकारी व्यवहारांसाठी येत्या रविवारी बँका चालू ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

बुलडाणा: आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस ३१ मार्च रविवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आला आहे. परंतू बँकामधील सरसकारी व्यवहारांसाठी येत्या रविवारी बँका चालू ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व सरकारी बँका रविवारी सुरू राहणार आहेत. मार्च एंन्डीगमुळे गेल्या महिनाभरापासून बँकामध्ये कामांची धूम सुरू आहे. सरकारी बँकाबरोबच पतसंस्थांमध्येही कर्मचारी कामात व्यस्त दिसून येत आहेत. दरम्यान, आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस ३१ मार्च, रविवारी असल्याने बँकेतील सरकारी कामकाजासाठी सर्व बँका रविवारी सुरू ठेवण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने तसे परिपत्रक काढून सर्व सरकारी बँकांना दिले आहे. या बँकाच्या शाखांमधील देवाण-घेवाणीचे व्यवहार ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक देवाण-घेवाणीची वेळही ३० आणि ३१ मार्च रोजी वाढविण्यात आलेल्या वेळेपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व सरकारी बँक रविवारी पूर्ण वेळ सुरू ठेवण्यात येणार आहेत. यामध्य कर भरणे, सरकारी अर्थिक व्यवहार पूर्ण करणे यासारखे कामे केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

 इंटरनेटच्या अडचणी कायमआर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस जस-जसा जवळ येत आहे, तशी बँकामधील कामेही वाढत आहेत.  वर्षभरातील आर्थिक व्यवहार जुळवणे, कर भरणे, कर्ज प्रकरणे निल करणे यासाखी कामे सध्या सुरू आहेत. त्याचबरोबर नागरिकांचे दैनंदिन व्यवहारही आहेत. ही सर्व कामे वाढलेली असताना बँकेमधील इंटरनेट सेवा वारंवार विस्किळीत होत आहे. मार्च महिन्यातही इंटरनेटच्या अडचणी येत असल्याने तासन् तास बँकेतील कामकाज थांबत आहे. त्यामुळे बँक कर्मचारी त्रस्त झाले आहेत. 

 येत्या रविवारी आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने जिल्ह्यातील सर्व सरकारी बँका सुरू राहणार आहेत. त्यामध्ये कर भरणे व सरकारी व्यवहार केले जाणार आहेत.  - उत्तम मनवर, व्यवस्थापक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया (अग्रणी बँक) बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाbankबँक