शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक,धार्मिक संस्थांजवळ निवडणूक कार्यालय उभारण्यास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 15:02 IST

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीचा २०१९ चा सार्वत्रिक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोबतच आदर्श आचारसंहीता लागू केली आहे. त्यानुषंगाने आचार संहिता कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लोकसभा निवडणुकीचा २०१९ चा सार्वत्रिक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोबतच आदर्श आचारसंहीता लागू केली आहे. त्यानुषंगाने आचार संहिता कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मतदान केंद्र, धार्मिक स्थळे, दवाखाना, शैक्षणिक संस्था या पासून २०० मीटरच्या आत कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार यांनी तात्पुरते कार्यालय उभारू नये, अशा स्पष्ट सुचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. यासोबतच सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेवर, कोणत्याही धार्मिक ठिकाणी किंवा अशा धार्मिक ठिकाणांच्या जागेत, कोणत्याही शैक्षणिक संस्था, रुग्णालयाला लागून अथवा विद्यमान मतदान केंद्राच्या २०० मीटरच्या आत कोणतेही अतिक्रमण करून कार्यालयात उघडता येणार नसल्याचेही अधोरेखीत करण्यात आले आहे.दुसीकडे अशा कार्यालयंवार पक्ष चिन्ह, छायाचित्रे असलेला केवळ एकच पक्ष ध्वज आणि बॅनर लावता येणार आहे. अशा कार्यालयांमध्ये वापरण्यात येणार्या बॅनरचा आकार स्थानिक कायद्याद्वारे फलक, जाहिरात फकल आदीहून लहान आकारात विहीत केलेला असले याची काळजी घेणे आवश्यक आहे. फौजदारी प्रक्रीया संहीता कलम १४४(१) या आदेशान्वये जिल्ह्यात उपरोक्त नियम लागू करण्यात आले आहेत. हा आदेश २७ मे २०१९ च्या मध्यरात्री पर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास भरातीय दंड संहीतेच्या कलम १८६० च्या कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी स्पष्ट केले आहे.मत देऊन परतणाऱ्यांना मंडपात प्रवेश नाहीमतदान केंद्रातून मत देऊन बाहेर पडलेल्या व्यक्तीस मंडपात येण्याची मुभा असणार नाही. सोबतच मंडप सांभाळणार्या व्यक्तींनी मतदान केंद्राकडे जाणार्या मतदारांच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण करू नये किंवा मतदाराला दुसर्या उमेदवाराच्या मंडपात जाण्यास प्रतिबंध करू नये. मतदान केंद्राच्या १०० मिटरच्या आतील भागात कोणासही जमाव करता येणार नाही. मतदारावर मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास दबाव आणू नये यासह अन्य काही मार्गदर्शक सुचनाही देण्यात आलेल्या आहेत.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक