बुलडाणा जिल्ह्याच्या दावणीला ‘नाविन्यपूर्ण’च्या २९८ गायी, म्हशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 02:40 PM2019-07-26T14:40:44+5:302019-07-26T14:40:52+5:30

बुलडाणा: शेतकऱ्यांना पूरक व्यवसायासाठी मदत म्हणून सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्याच्या वाट्याला २९८ गायी-म्हशी आल्या आहेत.

Baldana district's get 298 cows, buffalo from 'Navinypurn' scheme | बुलडाणा जिल्ह्याच्या दावणीला ‘नाविन्यपूर्ण’च्या २९८ गायी, म्हशी!

बुलडाणा जिल्ह्याच्या दावणीला ‘नाविन्यपूर्ण’च्या २९८ गायी, म्हशी!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शेतकऱ्यांना पूरक व्यवसायासाठी मदत म्हणून सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्याच्या वाट्याला २९८ गायी-म्हशी आल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यात १५० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पशुसंवर्धन विभागासमोर आहे. दूध उत्पादन वाढीला हातभार लावणाºया या योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशेने सध्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या हालचाली सुरू आहेत.
शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात. परंतू आजच्या महागाईच्या काळातही गायी, म्हशी बाळगणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे शेतकºयांना पुरक व्यवसायासाठी मदत म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत असून यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यांचीच निवड झाली आहे. त्यात बुलडाणा जिल्ह्याचा समावेश आहे. नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील व्यक्तींना गायी, म्हशींचे वाटप करण्यात येते. या योजनेंतर्गत ७५ टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरे गट वाटप केले जाते. दोन जनावरांमुळे कुटुंबाला नियमित उत्पन्नाची सोय होते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात १५० लाभार्थ्यांना प्रत्येक दोन याप्रमाणे २९८ गायी म्हशींचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील ५२ लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन याप्रमाणे १०४ गायी म्हशी दिल्या जाणार आहेत. तर अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील ९७ लाभार्थ्यांना १९४ गायी म्हशींचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये एका गायी, म्हशीची किंमत ४० हजार रुपये पकडण्यात येते. त्यानुसार दोन जनावरांच्या गटाकरीता ८० हजार रुपये प्रकल्प किंमत पकडण्यात येते. त्यांना ७५ टक्के अनुदानानुसार ६३ हजार ७९६ रुपये रक्कम दिल्या जाते.


आॅनलाइन अर्जासाठी ८ आॅगस्टची मुदत
नावन्यिपूर्ण योजनेच्या लाभासाठी प्रथम प्राधान्य क्रम हा महिला बचतगट त्यानंतर अल्पभूधारक एक ते दोन हेक्टरपर्यंतचे आणि सुशिक्षीत बेरोजगारांना दिल्या जाणार आहे. २५ जुलैपासून आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी ८ आॅगस्ट अंतीम मुदत देण्यात आली आहे.


शेळ्या मेंढ्यासाठी ८८ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट
४जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शेळ्या, मेंढ्यांचे गट वाटप करण्यात येत आहेत. शेळी, मेंढी गटांसाठी जिल्ह्यातून ८८ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन विभागाला देण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४३ लाभार्थी व अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील ४५ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

Web Title: Baldana district's get 298 cows, buffalo from 'Navinypurn' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.