शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात साकारली बाबासाहेबांची १२७ फुट लांबीची रांगोळी; रंगभरणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 16:44 IST

बुलडाणा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त साकारण्यात येणाऱ्या १२७ फूट लांबीच्या भव्य रांगोळीचे बुधवारी स्केच तयार करण्यात आले.

ठळक मुद्देअल्पसंख्यांक शिक्षण-प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मच्छी ले-आऊटमधील विशाल प्रांगणात १२७ फुट रांगोळीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी सकाळी ११ वाजेपासून रांगोळी काढण्यास सुरुवात करण्यात आली. गुरुवारी सकाळी बाबासाहेबांच्या भव्य रांगोळीत रंग भरणीला सुरुवात करण्यात आली.

बुलडाणा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त साकारण्यात येणाऱ्या १२७ फूट लांबीच्या भव्य रांगोळीचे बुधवारी स्केच तयार करण्यात आले. तर १२ एप्रिल रोजी या भव्य रांगोळीत रंग भरणीला सुरुवात झाली. संपूर्ण रांगोळी १३ एप्रिलच्या सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती प्रसिद्ध रांगोळीकार कृष्णा सासवडकर यांनी दिली. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धूमधडाक्यात व उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी १२७ वा जयंतीमहोत्सव असून देश व जगभरात मोठ्या आनंदात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने १४ एप्रिल रोजी सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील अल्पसंख्यांक शिक्षण-प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मच्छी ले-आऊटमधील विशाल प्रांगणात १२७ फुट रांगोळीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सतत तीन दिवस परिश्रम घेऊन ही भव्य रांगोळी पूर्ण करण्यात येणार आहे. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी सकाळी ११ वाजेपासून रांगोळी काढण्यास सुरुवात करण्यात आली. सायंकाळपर्यंत बाबासाहेबांच्या १२७ फुट लांब रांगोळीचे स्केच पूर्ण झाले. तर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या मुखवट्याची रांगोळी जवळपास पूर्ण झाली. गुरुवारी सकाळी बाबासाहेबांच्या भव्य रांगोळीत रंग भरणीला सुरुवात करण्यात आली. दुपारपर्यंत जवळपास अर्धे रंगकाम पूर्ण झाले. बाबासाहेबांची १२७ फुट रांगोळी साकारण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याने नागरिक रांगोळी पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. बुधवारी स्केच तयार करुन रांगोळीत रंग भरण्यास सुरु केल्याचे रांगोळीकार सासवडकर यांनी सांगितले. यावेळी शरद हिवाळे, गजानन गवई, राजु मोरे, बालु तायडे, राहुल सोनोने, प्रदीप जाधव, गोपाळ आराख, किरण मोकळे, अमोल हिवाळे, नितीन काळे, सागर जाधव, तुषार वाठोरे, राहुल गवई, प्रदीप मोरे यासह मच्छी ले-आऊटमधील नागरिक उपस्थित होते.

सेल्टी पॉर्इंट ठरणार आकर्षण

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १२७ फुट रांगोळी साकारण्यात येणार आहे. बुलडाण्यात पहिल्यांदाच हा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे बुलडाणेकरांना साक्षीदार होता यावे यासाठी रांगोळी साकारलेल्या संस्थेच्या प्रांगणात सेल्फी पॉर्इंट उभारण्यात येणार असल्याची माहिती संस्थाध्यक्ष दीपक मोरे यांनी दिली. हा सेल्फी पॉर्इंट बुलडाणेकरांसाठी आकर्षण ठरेल.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती