शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

भूजल पातळीत सरासरी दीड मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 16:45 IST

बुलडाणा, चिखली, मलकापूर, नांदुरा, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यात भूजल पातळीत वाढ झालेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: वाषिक सरासरीच्या २२ टक्के जादा पाऊस झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याची भुजल पातळी १.३९ मिटरने वाढल्याचे स्पष्ट झाले असले तरी देऊळगाव राजा, लोणार आणि सिंदखेड राजा तालुक्यात मात्र घट झाल्याचे चित्र आहे.वर्षभरात साधारणत: चार वेळा भूजल पातळीची तपासणी भुजल सर्व्हेक्षण विभागाकडून करण्यात येते. त्यानुषंगाने ही तपासणी करण्यात आली होती. यामध्ये बुलडाणा, चिखली, मलकापूर, नांदुरा, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यात भूजल पातळीत वाढ झालेली आहे. प्रामुख्याने १.११ मीटर ते ७.६० मिटर दरम्यान ही वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील १६७ निरीक्षण विहीरींची पाहणी केल्यानंतर ही आकडेवारी स्पष्ट झाली आहे. मात्र देऊळगाव राजा तालुक्याची भूजल पातळी ही उणे ०.०८, लोणारची उणे ०.१५ आणि सिंदखेड राजाची उणे ०.४५ मीटरने घटली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात उन्हान्यात प्रसंगी पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. मात्र येत्या काळात होणाऱ्या भुजल पातळीच्या तपासणीत सरासरी भुजल पातळीची अद्ययावत माहिती उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्यक्ष उन्हाळ््यात कोणत्या तालुक्यात प्रसंगी पाणीटंचाी निर्माण होईल, याचा अंदाज बांधणे शक्य होईल, असा अंदाज सुत्रांनी व्यक्त केला. एकंदरीत परिस्थिती पाहता जिल्ह्यात यावर्षी फारसी टंचाई जाणवणार नाही, असा अंदाज आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील काही भागाक अ‍ॅक्वीफोर (जलधर खडक) नसल्याने त्या भागात टंचाईची शक्यता नाकारता येत नाही.

टंचाई आराखडा ४.७३ कोटींचाजिल्ह्यात परतीच्या पावसाने यंदा उच्चांक गाठल्यामुळे पाणीटंचाईची शक्यता कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा हा ४.७३ कोटींच्या घरात आहे. गतवर्षी हाच टंचाई कृती आराखडा सातत्याने वाढत होता. गेल्या वर्षी तब्बल ४९ कोटी ३३ लाख रुपयांचा खर्च यावर झाला आहे. दरम्यान आॅक्टोबर २०१९ ते जून २०२० पर्यंतचा यंदाचा टंचाई कृती आराखडा पुर्णत्वास गेला असून जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यावर शिक्का मोर्तब केले आहे. डिसेंबर अखेर जिल्ह्यातील २१ गावात टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सव्वा कोटी रुपयांचया २६ योजना प्रस्तावीत करण्यात आल्या आहेत.

एप्रिल-जूनमध्ये ३३६ गावात टंचाईजानेवारी मार्च दरम्यान जिल्ह्यातील ९२ गावात पाणीटंचाईची शक्यता आहे. दरम्यान, एप्रील ते जून अखेरपर्यंत पाणीटंचाईची तीव्रता ही ३३६ गावात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यादृ्ष्टीने प्रशासनाने नियोजन केलेले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी