शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

युवकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 4:10 PM

काशिनाथ राजाराम उगले (वय ४५ वर्ष) शनिवारी रात्री आरोपी अशोक गणपत भिसे रा. देवधाबा (वय-६६ वर्ष) याच्या घरी  दारू पिण्यास गेला होता.

देवधाबा :  देवधाबा येथे दारूच्या पैशाच्या वादातून  युवकाच्या  अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी रात्री नऊ ते दहा वाजताच्या दरम्यान घडली. काशिनाथ राजाराम उगले असे जळालेल्या  युवकाचे नाव आहे.काशिनाथ राजाराम उगले (वय ४५ वर्ष) शनिवारी रात्री आरोपी अशोक गणपत भिसे रा. देवधाबा (वय-६६ वर्ष) याच्या घरी  दारू पिण्यास गेला होता. त्याला दारू दिली नाही, या कारणाने दोघांमध्ये दारूच्या व  पैशाच्या  व्यवहारावरून वाद झाला. त्यामध्ये आरोपी अशोक भिसे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले, अशी तक्रार पोलिसात केली. मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरूद्ध ३०७ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आला. पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय तायडे, बिट जमादार विश्वजीत ठाकूर करीत आहेत.

- शेजाºयांनी विझवलेआरोपी अशोक भिसे याचा अवैध दारूचा व्यवसाय आहे.  काशीनाथ उगले याला दारूचे व्यसन आहे. दोघांमध्ये वाद झाल्याने भिसे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले. जळालेल्या अवस्थेत तो घराबाहेर आला. यावेळी  शेजारी व जमलेल्या नातेवाईकांनी त्याच्या अंगाला लागलेली आग विझवली. तसेच पुढील उपचारा करीता मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी