शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अटल आरोग्य महाशिबिर; दिड लाखावर रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 15:29 IST

योगेश फरपट / अनिल उंबरकार  शेगाव. जि बुलडाणा : अटल आरोग्य महाशिबिराअंतर्गत नोंदणी झालेल्या दिड लाखांवर रूग्णांना प्रत्यक्ष उपस्थिती ...

ठळक मुद्दे शिबिरात सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा दिल्या जात आहेत.सव्वा कोटी रुपयांची औषधी याठिकाणी वितरण केली जात आहे.जेवणाची व्यवस्था श्री गजानन महाराज संस्थांनच्यावतीने केली आहे. 

योगेश फरपट / अनिल उंबरकार शेगाव. जि बुलडाणा : अटल आरोग्य महाशिबिराअंतर्गत नोंदणी झालेल्या दिड लाखांवर रूग्णांना प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवीत रविवारी तपासणी करून घेतली. या महाशिबिराचे उद्घाटन पालकमंत्री  मदन येरावार व गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे हस्ते पार पडले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व राज्याचे वैद्यकीय शिक्षण तसेच जलसंपदा मंत्री  गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य विनामूल्य अटल आरोग्य महाशिबीर रविवारी  २३ डिसेंबर रोजी येथील  विसावा भक्त निवास संकुलजवळील साठ एकरच्या भव्य प्रांगणामध्ये पार पडत आहे. शिबिराच्या सुरवातीला आ. चैनसुख संचेती, आ. डाॅ. संजय कुटे व आ.आकाश फुंडकर यांनी श्री गजानन महाराज यांची आरती करून अटलजींच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी गिरीश महाजन यांचे स्विय सहायक रामेश्वर नाईक,  भाजप जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, नगराध्यक्षा सौ शकुंतलाबाई बुच, न प उपाध्यक्षा ज्योतीताई कचरे, अपर्णाताई कुटे, संतोष देशमुख, शरद अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे, मुख्य  कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अतिरिक्त पोलीस अधिक्षक शाम घुगे, न प मुख्याधिकारी अतुल पंत यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स उपस्थित होते. शिबिरात सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा दिल्या जात आहेत. सव्वा कोटी रुपयांची औषधी याठिकाणी वितरण केली जात आहे. याशिवाय रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था श्री गजानन महाराज संस्थांनच्यावतीने केली आहे. 

रणजित पाटील यांनी केली तपासणी शिबिरात डॉ रणजित पाटील यांनी प्रत्यक्ष सहभागी होत अस्थिरुग्णांची तपासणी केली. पालकमंत्री मदन येरावर यांनी औषधे वितरण केले. आमदार कुटे, फुंडकर ठाण मांडूनशिबिराचे संयोजक तथा आमदार डॉ संजय कुटे सकाळपासून शिबिरस्थळी ठाण मांडून आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आमदार अॅड. आकाश फुंडकर हे सुद्धा स्वतः रुग्णांची आस्थेने चौकशी करीत आहेत.

टॅग्स :ShegaonशेगावHealthआरोग्यDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील