शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

अशोक चव्हाणांना काटेल येथे चढला ‘ताप’!;अस्वास्थामुळे जनसंघर्ष यात्रा दौरा सोडला अर्ध्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 22:02 IST

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त विदर्भ दौ-यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपला नियोजित दौरा अर्ध्यावर सोडावा लागला.

- अजहर अली

संग्रामपूर : काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त विदर्भ दौ-यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपला नियोजित दौरा अर्ध्यावर सोडावा लागला. संग्रामपूर तालुक्यातील श्री क्षेत्र काटेल येथे दर्शनासाठी जात असताना चव्हाण यांची प्रकृती बिघडली. या आकस्मिक घटनेमुळे क्षणभर सर्वच घाबरले होते.राज्यातील भाजप सरकारच्या शेतकरी आणि सर्व सामान्य विरोधी धोरणाच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हक्कासाठी ’ पश्चिम विदर्भातील अकोट, वरवट-बकाल आणि खामगाव येथे जनसंघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली. या यात्रेदरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अकोट येथील दौरा आटोपून, जेवण केल्यानंतर शनिवारी दुपारी सोनाळा मार्गे  संग्रामपूरकडे निघाले. वाटेत श्री क्षेत्र काटेल येथील संत गुलाबबाबा संस्थान येथे दर्शनासाठी जात असताना, त्यांचे अचानक पोट बिघडले. तसेच ताप चढला. तसेच घरघरल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे पुढील नियोजित कार्यक्रम रद्द करून त्यांनी काटेल येथे विश्राम केला. यावेळी त्यांच्यावर डॉ. दलाल, डॉ. संजय कोलते, डॉ.वाकेकर, डॉ. पुरूषोत्तम दातकर यांनी त्यांच्यावर उपचार केला. 

भोवळ आल्याची चर्चा!केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभावेळी भोवळ आल्याचा प्रकार ताजा असतानाच, शनिवारी काटेल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रकृती बिघडल्याची घटना घडली. तर माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना भोवळ आल्याची चर्चा परिसरात होती.

गुलाबबाबांवर  श्रध्दा!काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे वडील स्व. शंकरराव चव्हाण काटेल येथील संत गुलाबबाबांचे भक्त होते. त्यामुळेच १९८०-८२ च्या कालावधीत ते काटेल येथे आले होते.  त्यानंतर शनिवारी अशोक चव्हाण काटेल येथे दर्शनासाठी आले होते. दरम्यान, प्रकृती बिघडल्याने, त्यांनी आपला पुढील दौरा रद्द केला. काटेल येथून रात्री ८:३० वाजता दरम्यान, ते शेगावकडे निघाले होते. शेगाव येथून औरंगाबाद येथे जाणार असल्याचे समजते.

काटेल येथे अशोकराव चव्हाणांचे  पोट बिघडले होते. तसेच त्यांना तापही चढला होता. सततच्या प्रवासामुळे ही घटना घडली असली तरी, आता ते सुखरूप आहेत.- डॉ. एस.के.दलाल

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण