शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी एकादशी : हजारो भाविक शेगावात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 15:09 IST

सोमवारी आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पाऊले शेगावकडे वळत असून रविवारी शेगाव शहर  भाविकांनी गजबजून गेले.

ठळक मुद्देपंढरपूरला जाऊ शकत नाहीत, असे लाखो भाविक  आषाढ शु.११ देवशयनी आषाढी एकादशीला शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेवून धन्य होतात.   आषाढी एकादशी सोमवारी असली, तरी रविवारपासूनच भाविकांनी संतनगरी शेगावात गर्दी केली आहे.  हरिनाम तसेच गजानन महाराजांच्या  जयघोषाने संतनगरी दुमदुमली आहे.

- गजानन कलोरे    शेगाव : विदर्भाची  पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात. सोमवारी आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पाऊले शेगावकडे वळत असून रविवारी शेगाव शहर  भाविकांनी गजबजून गेले.सोमवारी आषाढी एकादशी असल्याने शेगावात महोत्सव पाहाय मिळेल.  या महोत्सवानिमित्त अनेक भाविक पंढपूरला गेले आहेत. परंतु जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, असे लाखो भाविक  आषाढ शु.११ देवशयनी आषाढी एकादशीला शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेवून धन्य होतात.  आषाढी एकादशी निमित्त सोमवार दुपारी २ वाजता श्रींची पालखी हरिनामाच्या गजरात नगरपरिक्रमेला निघेल. श्रींची पालखी श्री दत्त मंदिर, श्री हरहर मंदिर, श्री शितलनाथ महाराज संस्थान, सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेसमोरुन श्रींचे प्रगटस्थळ, श्री मारोती मंदिर, श्री गोरोबा काका मंदिर, लायब्ररी, प्राचीन शिवमंदिर, मातीची गढी, आठवडी बाजार चौक, बसस्थानक, व्यापारपेठ, गांधी चौक, लहुजी वस्ताद चौक या मार्गाने फिरून मंदिरात परत येईल. येथे पूजाअर्चा, आरती होवून आषाढी एकादशी यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे. पंढरपूर येथे शेगाव संस्थानच्या शाखांमध्ये सुध्दा आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येत आहे. संतनगरीत श्रींचे भक्त, वारकºयांसाठी फराळाची व्यवस्था करतात. श्री लहुजी उस्ताद चौकात श्री भक्त मंडळ व संत गजानन महाराज न्यु मार्केट  यांच्यावतीने भक्तांना, वारकºयांना फराळी खिचडी, उसळचे वाटप करण्यात येते. दरम्यान आषाढी एकादशी सोमवारी असली, तरी रविवारपासूनच भाविकांनी संतनगरी शेगावात गर्दी केली आहे.  हरिनाम तसेच गजानन महाराजांच्या  जयघोषाने संतनगरी दुमदुमली आहे.

टॅग्स :ShegaonशेगावAshadhi Ekadashiआषाढी एकादशीGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिर