शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जबाबदारी निश्चित करून कामे मार्गी लावणार - अरविंद चावरीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 18:51 IST

रिझल्ट ओरिएंट कामे करण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पोलिस दलातील कमी असलेल्या मनुष्यबळाचा समतोल राखून रिझल्ट ओरिएंट कामे करण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी दिली. तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधीत रहावी यासाठी रेकॉर्ड वरील गुन्हेगार शोधून त्यांचा बंदोबस्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर बुलडाणा पोलिस दलात नवीन काय करणार याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोणते नवीन उपक्रम राबवणार?सध्या त्या दृष्टीने अभ्यास सुरू आहे. मात्र पोलिस कॉन्स्टेबल ते अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी त्यांनी १०० टक्के पुर्ण करून कामे निकाली काढण्यावर आपला भर राहणार आहे. प्रथमत: कर्तव्याला प्राधान्य देवून कायदा व सुव्यस्था आबाधीत राहील यासाठी प्रयत्नरत राहणार.

संवेदनशील भागात पोलिसांची कमतरता आहे?हो. संवेदनशील म्हणून गणल्या जाणाºया खामगाव, मलकापूर, शेगाव, सह अन्य पट्ट्यात मनुष्यबळ कमी आहे. तेथे ते वाढविण्यास प्राधान्य दिले असून चार पैकी तीन दंगा काबू पथके प्रामुख्याने या भागात ठेवण्यात आले आहेत. संख्याबळ वाढविण्यासही सुरूवात केली.

दंगा काबू पथकाचे पुनर्गठन करण्यामागील उद्देश?जिल्ह्याची एकंदर स्थिती पाहता नियमानुसार चार दंगा काबू पथके असणे गरजेचे आहे. त्यातच १३२ पेक्षा अधिक पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे पाच ऐवजी चार दंगाकाबू पथके आता राहतील. संवेदनशील असलेल्या मलकापूर, खामगाव शेगाव येथे पैकी तीन तैनात केले आहेत.

पोलिस दलातील कोरोना प्रतिबंधासाठी काय करणार?पोलिस दलातही ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यात येत असून ठाणेदार व एसडीपीओ त्या भागाचे कुटुंब प्रमुख केले आहेत. दैनंदिनस्तरावर त्याचा आढावा घेत असून अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष देतात.

नवीन पोलिस उपविभागाबाबत  हालचाली आहेत का?नवीन पोलिस उपविभागा स्थापन्यासंदर्भात शासनस्तरावर हालाचली आहेत. तसा प्रस्ताव गेला आहे. जळगाव जामोद, चिखली आणि अन्य एका अश्या तीन एसडीपीओ कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करणार आहोत. मुळात २७३२ पोलिसांची जिल्ह्यास गरज असताना २६०० पोलिस आज कार्यरत आहेत. ११९  पीएसआयची गरज असताना ३३ कमी आहेत. दोन पीआय आणि दोन एसडीपीओंची पदे रिक्त आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करून कायदा व सुव्यवस्था राखण्यास गुणात्मक प्राधान्य राहील.सण उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था आबाधीत रहावी या दृष्टीकोणातून नऊ गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव सादर केला आहे. कोवीड संसर्गाच्या संदर्भाने गणेशोस्तवाप्रमाणेच दुर्गा उत्सव साजरा करण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुषंगाने शांतता समित्याच्या बैठकाही येत्या आठवड्यात घेणार असून नियमानुसार सर्व होईल. कमी मनुष्यबळ असल्याने दंगाकाबू पथकाचे पुनर्गठन करण्यात आले असून जिल्हा मुख्यालयी ही कर्मचारी वाढवले आहेत- अरविंद चावरिय , जिल्हा पोलिस अधीक्षक, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिसinterviewमुलाखत