शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

श्रींच्या पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ भजनी दिंड्यांचे आगमन; टाळ-मृदंगाचा गजर

By सदानंद सिरसाट | Updated: September 16, 2023 18:56 IST

श्री गजानन महाराज संस्थानमध्ये भक्तांची वाढती गर्दी नियंत्रण करण्यासाठी व सतत जाण्या-येण्यासाठीच्या मार्गात सोयीनुसार बदल करावे लागतात.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव (बुलढाणा) : श्री गजानन महाराज संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ झाला आहे. त्यासाठी शनिवारी सकाळी १० वाजता ब्रह्मवृंदाच्या हस्ते विधिवत पूजन करून मंत्रोपचारात श्री गणेश याग व वरुण यागास आरंभ करण्यात आला. श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाचे निमित्ताने संतनगरीत गावोगावीच्या भजनी दिंड्यांचे आगमन होत असून, जिकडेतिकडे भगवे पताकाधारी वारकरी व टाळ-मृदंगाचा गजर ऐकावयास मिळत आहे.

श्री संस्थानात काकड, आरती, भजन, प्रवचन व कीर्तन महाप्रसाद हे कार्यक्रम नित्यक्रमाने सुरू आहेत. तसेच श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्ताने १६ सप्टेंबरपासून श्री गणेश याग व श्री वरुण यागाला सुरुवात झाली. २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती होणार आहे.

या उत्सवानिमित्त १६ सप्टेंबरपासून दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे. यात शनिवारी हभप सुनील शिंगणे देऊळगाव मही यांचे कीर्तन झाले. तसेच १७ सप्टेंबर रोजी अनिरुद्ध महाराज क्षीरसागर सावरगाव, १८ रोजी गणेश महाराज हुंबड महागाव, १९ रोजी पंडित बुवा क्षीरसागर आळंदी, २० रोजी भारत बुवा म्हैसवाडीकर यांचे कीर्तन होणार आहे. त्याच दिवशी सकाळी श्रींच्या समाधी सोहळ्यावर कीर्तन होईल. सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती व दुपारी श्रींची पालखी परिक्रमा निघणार आहे. २१ रोजी श्रीधरबुवा आवारे यांचे सकाळी ६ वाजता काल्याच्या कीर्तनाने पुण्यतिथी उत्सवाची सांगता होईल.

दिंड्या व मिरवणुकांसाठी १२ मीटरचा नवा मार्गश्री गजानन महाराज संस्थानमध्ये भक्तांची वाढती गर्दी नियंत्रण करण्यासाठी व सतत जाण्या-येण्यासाठीच्या मार्गात सोयीनुसार बदल करावे लागतात. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गर्दी नियंत्रणासाठी मंदिर प्रशासनाने १२ मीटर रुंदीचा नवीन रस्ता तयार करून वाहतुकीस मोकळा करून दिला आहे. यंदाच्या श्रींच्या समाधी सोहळ्यापासून सर्वच उत्सवानिमित्त येणाऱ्या भजनी दिंड्या, तसेच गावातील शोभायात्रा, मिरवणुका आता याच मार्गाने येतील व पुढे दक्षिण प्रवेशद्वारातून बाहेर निघतील. यासाठी शहरवासीयांसह सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले.

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराज