बालाजी महाराजांच्या मूर्तींचे नूतनीकरणानंतर देऊळगाव राजात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:35 AM2021-07-27T04:35:39+5:302021-07-27T04:35:39+5:30

त्यानंतर, २४ जुलै रोजी त्या सर्व परिवार मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा विधीचा मुहूर्त काढण्यात आला. त्यानुसार, श्रावण प्रतिपदा ०९ ऑगस्ट रोजी ...

Arrival at Deulgaon Raja after renovation of idols of Balaji Maharaj | बालाजी महाराजांच्या मूर्तींचे नूतनीकरणानंतर देऊळगाव राजात आगमन

बालाजी महाराजांच्या मूर्तींचे नूतनीकरणानंतर देऊळगाव राजात आगमन

Next

त्यानंतर, २४ जुलै रोजी त्या सर्व परिवार मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा विधीचा मुहूर्त काढण्यात आला. त्यानुसार, श्रावण प्रतिपदा ०९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता अनुष्ठानास सुरुवात करून, नागपंचमीच्या दिवशी १३ ऑगस्ट रोजी सकाळी या परिवार मूर्तींची श्रीजींच्या गाभाऱ्यामध्ये विधीवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासंबंधी झालेल्या २४ जुलै रोजीच्या सभेमध्ये श्री बालाजी महाराजांच्या मंदिरात संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला. या प्रसंगी राजाभाऊ पुजारी, गोविंद देव, श्रीकांत वाजपे, श्रीपाद गोंदकर, विनायक टोणपे, वसंतराव कुलकर्णी, मयूर पुजारी, रामेश्वर पाठक, दिलीप पुजारी, राम पुजारी, चंद्रकांत पुजारी, उदय पुजारी, शुभम देव उपाध्ये, अनिल मल्लावत, सुरज गुप्ता, व्यवस्थापक नंदकिशोर बीडकर, आशिष वैद्य आदी उपस्थित होते. ही सभा शासनाने ठरवून दिलेल्या कोविडविषयक सर्व नियमांचे पालन करून पार पडली.

Web Title: Arrival at Deulgaon Raja after renovation of idols of Balaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.