शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
4
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
5
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
6
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
7
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
8
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
9
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
10
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
11
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
12
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
13
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
14
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
15
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
16
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
17
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
18
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
19
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
20
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Daily Top 2Weekly Top 5

 देवीचा मुकुट बसविण्याचा वाद, घरात घुसून मारहाण; मंदिरात चोरीच्या घटनेनंतर जागा मालकाला शिवीगाळ

By सदानंद सिरसाट | Updated: October 29, 2023 15:45 IST

याप्रकरणी लालबाबा देवी मंदिर परिसराची जागा मालकी असलेले सतीश नंदकिशोर मुरारका यांनी शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

खामगाव (बुलढाणा) : शेगाव शहरातील अकोट रोडवरील लालबाबा देवीच्या मंदिरात चोरी झाल्यानंतर त्याठिकाणी देवीचा मुकुट बसविण्याबाबत वाद घालत लालबाबा मंदिर जागा मालकाच्या घरात घुसून मारहाण करणे, तसेच तक्रार देण्यास गेले असता, रस्त्यात अडवून पुन्हा मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेगावातील आरोपी गजानन नाईकवाडे, प्रमोद सुळ यांच्यासह ८ ते १० अनोळखी आरोपींवर पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी लालबाबा देवी मंदिर परिसराची जागा मालकी असलेले सतीश नंदकिशोर मुरारका यांनी शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये अकोट रोडवर त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये लालबाबा देवी मंदिर आहे. शुक्रवारी रात्री अज्ञाताने मंदिरामधील देवीचा मुकुट तसेच इतर सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्याबाबतचा गुन्हा पोलिसात दाखल आहे. त्यानंतर सतीश कचरे याने मुरारका यांना फोन करून देवीचा मुकुट बसवायचा आहे, असे म्हटले. त्यावर मुरारका यांनी ते काम त्यांचे भाऊ पाहतात, असे सांगितले. त्यानंतर आरोपी गजानन नाईकवाडे, प्रमोद सुळ यांच्यासह आठ ते दहा आरोपींनी मुरारका यांच्या घरात घुसून लालबाबा देवीचा मुकुट कसे काय बसवू देत नाही, असे म्हणून काठीने व लोखंडी बकेट डोक्यात मारून जखमी केले. घरातील विद्युत मीटरचे तसेच इतर सामानाची तोडफोड करून नुकसान केले. त्यावेळी तक्रार देण्यासाठी ते निघाले असता, दुचाकी अडवून दोन्ही आरोपींनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. मुरारका यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ४५२, ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ३२७, ४२७, ३४१, ५०१, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक कुणाल जाधव करत आहेत.

- मंदिरात प्रवेश नाकारल्याची तक्रारशनिवारी सकाळी लालबाबा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले असता, त्याठिकाणी जाण्यास मज्जाव करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार ज्योती अमोल तायडे या विवाहितेने केली. त्यावरून लालबाबा देवी मंदिर जागेचा मालक सतीश नंदकिशोर मुरारका याच्यावर अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ज्योती तायडे हिने पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये सकाळी दिरासह देवीच्या मंदिरात गेली असता, हा प्रकार घडल्याचे म्हटले. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे करत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTempleमंदिर