शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

३५७ कोटींच्या वार्षिक प्रारूप आराखड्यास ‘डीपीसी’ची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 16:42 IST

प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून त्यास २५ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :आगामी वित्तीय वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक योजना, अनुसुचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजना मिळून ३५७ कोटी ५३ लाख रुपायंच्या प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून त्यास २५ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.यामध्ये २१६ कोटी ३६ लाख रुपयांची सर्व साधारण योजना, १२७ कोटी पाच लाख रुपयांची अनुसूचित जाती उपयोजना आणि १४ कोटी १२ लाख रुपयांच्या आदिवासी उपयोजनेचा यात समावेश आहे. दरम्यान, समितीने प्रस्तावीत केलेल्या आराखड्यातून आरोग्य, शिक्षण, ग्रामविकासाच्या कामांना प्राधान्य देण्यात देण्यात येऊन जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साधण्यास प्राधान्य देणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये झालेल्या या बैठकीस खा. प्रतापराव जाधव, जिल्हा परिषद अधअयक्ष मनिषा पवार, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. षण्मुखराजन, पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, नियोजन अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते. यासह आ. डॉ. संजय कुटे, अ‍ॅड. अकाश फुंडकर, संजय गायकवाड, राजेश ऐकडे, श्वेता महाले या सभागृहात उपस्थित होत्या.दरम्यान, जिल्ह्यात रोही प्राण्यांची वाढलेली संख्या व शेतकऱ्यांना होणारा त्रास पाहता त्यांच्या प्रजननावर जैविक नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे ना. डॉ. शिंगणे यांनी सुचविले. शेतीपिकाचे नुकसान टाळण्यासाठी अशा गावांजवळ फेन्सींग किंवा चर खोदून होणारा त्रास कमी करण्यास प्राधान्य द्यावे, असे सुचवले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणे