विभागीय बास्केटबॉल स्पर्धेत अनुराधा तंत्रनिकेतन विजयी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:52 PM2018-02-04T23:52:51+5:302018-02-04T23:53:17+5:30

चिखली: स्थानिक अनुराधा तंत्ननिकेतनमध्ये विभागीय व्हॉलीबॉल, बास्केटबॉल व फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनुराधा तंत्ननिकेतनच्या चमूने बास्केटबॉलमध्ये विजेता, तर व्हॉलीबॉलमध्ये उपविजेतेपद पटकाविले आहे.

Anuradha engineering college won the basketball tournament! | विभागीय बास्केटबॉल स्पर्धेत अनुराधा तंत्रनिकेतन विजयी!

विभागीय बास्केटबॉल स्पर्धेत अनुराधा तंत्रनिकेतन विजयी!

Next
ठळक मुद्देव्हॉलीबॉलमध्ये पटकाविले उपविजेतेपद

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: स्थानिक अनुराधा तंत्ननिकेतनमध्ये विभागीय व्हॉलीबॉल, बास्केटबॉल व फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनुराधा तंत्ननिकेतनच्या चमूने बास्केटबॉलमध्ये विजेता, तर व्हॉलीबॉलमध्ये उपविजेतेपद पटकाविले आहे.
स्थानिक अनुराधा तंत्ननिकेतनमध्ये पार पडलेल्या या स्पध्रेचे उद्घाटन तलवारबाजीचे राष्ट्रीय खेळाडू रणजित पडोळ यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.के.एच. वळसे होते. व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये एच २ झोन अंतर्गत एकूण १९ संघानी सहभाग घेतला होता. त्यामधून शासकीय तंत्निनकेतन खामगाव चा संघ विजेता, तर अनुराधा तंत्निनकेतन  चिखलीचा संघ उपविजेता ठरला. बास्केटबॉल स्पध्रेत एकूण सहा संघांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये  अनुराधा तंत्ननिकेतन  चिखली विजेता, तर शासकीय तंत्ननिकेतन वाशिमचा संघ उपविजेता ठरला. फुटबॉल स्पर्धेमध्ये पाच संघांनी सहभाग नोंदविला  होता. यामध्ये रामभाऊ लिंगाडे तंत्ननिकेतन बुलडाणा विजेता, तर सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसचा संघ उपविजेता ठरला. सर्वसामन्यांमध्ये पंच म्हणून नरेश चोपडे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी प्रा.पी.जी. आमले, प्रा.एस.डी. खान, प्रा.एस.एच. कुडके, प्रा.एन.एस. सोळंकी व के.एस. बाजड, ओ.के. नागरे, एम.आर. दाभाडे, एम.डी. शकील, डी.पी. देशमुख यांनी परिo्रम घेतले. विजयी संघास प्राचार्य डॉ.के.एच. वळसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य वळसे म्हणाले की, कोणताही खेळ हा खेळ वृत्तीने खेळल्यास खेळाडूंना यश मिळते. यासाठी नियमित सराव करून खेळा प्रती योगदान देणे आवश्यक आहे.  विजयी खेळाडूंचा इतर विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन विविध खेळात सहभागी होण्याचे आवाहन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सिद्धविनायक बोंद्रे, सचिव आ. राहुल बोंद्रे व विश्‍वस्त मंडळाने समाधान व्यक्त केले आहे. 

Web Title: Anuradha engineering college won the basketball tournament!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.