खामगांव न्यायालयाच्या नवीन ईमारतीचा आणखी एक अडथळा दूर; पंचायत समितिने दिला जागेचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:44 PM2018-08-31T13:44:02+5:302018-08-31T13:46:05+5:30

खामगांव: येथील 111 वर्ष जुन्या न्यायालयीन इमारतीच्या जागी नवीन इमारतीतील आणखी एक अडथळा दूर झाला आहे. पंचायत समितिने ताब्यात असलेली न्यायालयाची जागा न्यायालयाच्या ताब्यात दिली आहे.

Another hurdle away to the Khamgaon court's new building | खामगांव न्यायालयाच्या नवीन ईमारतीचा आणखी एक अडथळा दूर; पंचायत समितिने दिला जागेचा ताबा

खामगांव न्यायालयाच्या नवीन ईमारतीचा आणखी एक अडथळा दूर; पंचायत समितिने दिला जागेचा ताबा

Next
ठळक मुद्दे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूर्यवंशी  यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे. शासनाचा 30 हजार चौरस फुटाचा प्लॉट सुद्धा न्यायालयाच्या नवीन इमारतीकरिता हस्तांतरित करण्यात आलेला आहे.

खामगांव: येथील 111 वर्ष जुन्या न्यायालयीन इमारतीच्या जागी नवीन इमारतीतील आणखी एक अडथळा दूर झाला आहे. पंचायत समितिने ताब्यात असलेली न्यायालयाची जागा न्यायालयाच्या ताब्यात दिली आहे.
खामगांव जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची इमारत ही 111 वर्ष जूनी असून जीर्ण होत आहे. त्यामुळे न्यायाधीश, वकील नवीन इमारत व्हावी याकरिता काही दिवसांपासून प्रयत्नशील आहे. येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूर्यवंशी  यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे. आमदार आकाशदादा फुंडकर यांनी सुद्धा त्यास साकारात्मक प्रतिसाद देत तहसील कार्यालयाच्या ताब्यात असलेली इमारत, जि. प. च्या ताब्यात असलेली जागा खाली करून घेतली. त्यानंतर शासनाचा 30 हजार चौरस फुटाचा प्लॉट सुद्धा न्यायालयाच्या नवीन इमारतीकरिता हस्तांतरित करण्यात आलेला आहे. नवीन इमारतीच्या प्रस्तावाकरिता खुप वर्षांपासून इतर विभागाच्या ताब्यात असलेली जागेमुळे आडकाठी येत होती. दि. 30 अगस्त रोजी प. स.चे गट विकास अधिकारी शिंदे यांनी सदर इमारतीचा ताबा न्यायाधीश सूर्यवंशी साहेब यांच्याकडे दिला. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ऍड. आळशी, ऍड. आपटे, ऍड. शेख, ऍड. शेखर जोशी, ऍड. गव्हादे, ऍड. सोनी, ऍड. इंगळे, शरदचंद्र गायकी, न्यायालयीन कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. सदर जागेचा ताबा मिळाल्यामुळे नवीन इमारतीतील एक अडथळा दूर झाला आहे, अशी माहिती वकील संघाचे अध्यक्ष ऍड. अजय आळशी यांनी दिली आहे.

कोषागारकरिता लवकरच पर्यायी जागा - आ. फुंडकर
खामगांवच्या न्यायालयाची इमारत जूनी असून अपुरी पड़त आहे. न्या. सूर्यवंशी साहेब नवीन इमारतसाठी सतत प्रयत्नशील आहे. नवीन इमारतीकरिता अडथळा असलेले कोषागार करिता लवकरच पर्यायी जागा शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती आ. आकाश फुंडकर यांनी दिली आहे.

Web Title: Another hurdle away to the Khamgaon court's new building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.