शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील भूखंड घोटाळ्यात आणखी एका आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:31 IST

बनावट मालक म्हणून उभा राहणाऱ्या प्रभाकर पिसे याला गुरूवारी अडसुळ ता. शेगाव येथून अटक करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील बहुचर्चित निलंबित तलाठी राजेश चोपडे प्लॉट घोटाळा प्रकरणातील आणखी एका आरोपीच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या आहेत. मुळ मालकाच्या नावे बनावट मालक म्हणून उभा राहणाऱ्या प्रभाकर पिसे याला गुरूवारी अडसुळ ता. शेगाव येथून अटक करण्यात आली.खामगाव येथील भाग-१ चा निलंबित तलाठी राजेश चोपडे याने शासकीय दस्तवेजात खाडाखोड, छेडछाड तसेच पाने फाडून मोठ्या प्रमाणात प्लॉट खरेदी-विक्रीचा घोटाळा केला. याप्रकरणी राजेश चोपडेसह इतरांवर फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल झाले. यामध्ये आतापर्यंत चोपडेसह ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील दोघांना जामिन मंजूर करण्यात आला आहे. गुरूवारी शहर पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात एएसआय अनारकर आणि पोकॉ. हटकर यांनी सापळा रचून प्रभाकर पिसे रा. अडसुळ यास अटक केली. त्यामुळे प्लॉट घोटाळ्यातील आरोपींचे धाबे दणाणले आहे. एक आरोपी सापडला होता जुगार खेळताना !प्लॉट घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार तलाठी राजेश चोपडे याचा खासमखास असलेला दलाल पंकज घोरपडे याने याप्रकरणी न्यायालयातून अटकपूर्व जामिन मिळविला आहे. गत आठवड्यात शेगाव रोडवरील एका हॉटेलात पंकज घोरपडे याला जुगार खेळताना अटक करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे प्लॉट घोटाळ्यातील रक्कमेचा मुख्य सुत्रधारांसह इतर आरोपींकडूनही चैनींच्या वस्तू खरेदी करणे आणि शौकांसाठी वापर करण्यात येत असल्याचे आता समोर येत आहे.

 

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी