आणखी ७५ कोरोनाबाधीत; ३३९ जणांचे अहवाल निगेटीव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 11:03 AM2020-07-31T11:03:16+5:302020-07-31T11:03:41+5:30

जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा येथील एका बाधीताचा मृत्यू झाला.

Another 75 corona affected; 339 negative reports! | आणखी ७५ कोरोनाबाधीत; ३३९ जणांचे अहवाल निगेटीव्ह!

आणखी ७५ कोरोनाबाधीत; ३३९ जणांचे अहवाल निगेटीव्ह!

Next

बुलडाणा: जिल्ह्यात गुरूवारी तब्बल ७५ कोरोना बाधीत आढळून आले असून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या त्यामुळे १,२०९ वर पोहोचली आहे. पैकी ४३६ रुग्ण हे अ‍ॅक्टीव रुग्ण आहेत.तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविलेले व रॅपीड टेस्टमधील असे मिळून एकूण ४१४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा येथील एका बाधीताचा मृत्यू झाला.
गुरुवारी कोरोना बाधीत आढळून आलेल्यांमध्ये नांदुरा येथील १४, चांदुरबिस्वा येथील सात, धानोरा खुर्द येथील एक, माकोडी येथील एक, मलकापूर शहरातील चार जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. टाकळी येथील तीन, बुलडाणा शहरातील तेलगूनगरमधील दोन, जिल्हा रुग्णालयातील एक, इंदिरा नगरमधील तीन असे एकूण सहा, दिवठाणा येथील दोन, सवणा येथील दोन, अमडापूर येथील एक, चिखली येथील तीन, आंचरवाडी येथील दोन, शेगावमधील तीन, असोला येथील १२, देऊळगाव राजा येथील दोन, देऊळगाव मही येथील एक, खामगावमध्ये आठ या प्रमाणे एकूण ७५ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा खामगाव येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, नांदुरा येथील दोन जणांना अकोला येथे रेफर करण्यात आले आहे.
दुसरीकडे आजपर्यंत ८,३९४ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर कोरोनामुक्त झालेल्या ७४४ जणांची आतापर्यंत रुग्णालयातून सुटी झाली आहे. अद्याप ३८३ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा असून कोरोना बाधितांची संख्या १,२०९ झाली तर मृत्यू पावलेल्यांची संख्या २९ झाली आहे.


४५ रुग्णांची कोरोनावर मात
गुरूवारी ४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे वैद्यकीय संकेतानुसार त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये शेगाव येथील दोन, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील दोन, चांदुरबिस्वा येथील एक, खामगाव येथील दहा, जळगाव जामोदमधील सहा, शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील एक, नांदुरा शहरातील नऊ, नांदुरा खुर्दमधील दहा, येरळी येथील दोन, चांदुर बिस्वा येथील दोन जणांचा समावेश आहे. आणि नांदुरा येथील तसेच नांदुरा येथील 18 वर्षीय मुलगी व 65 वर्षीय पुरूष अकोला येथे रेफर करण्यात आले आहे.

 

Web Title: Another 75 corona affected; 339 negative reports!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.