शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या पिकात घुसवली जनावरे! उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 13:49 IST

पाणी टंचाईच्या असह्य झळा सोसवत पिकविलेल्या उत्पादनातून खर्चही निघेनासा झाल्याने, खामगाव परिसरातील शेतक-यांनी थेट उभ्या पिकात जनावरे घुसविली. वांग्याचे दर कोसळल्याने काही शेतक-यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

- अनिल गवईबुलडाणा  - पाणी टंचाईच्या असह्य झळा सोसवत पिकविलेल्या उत्पादनातून खर्चही निघेनासा झाल्याने, खामगाव परिसरातील शेतक-यांनी थेट उभ्या पिकात जनावरे घुसविली. वांग्याचे दर कोसळल्याने काही शेतक-यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

जीवनावश्यक वस्तूंचे दर गगणाला भिडत असतानाच, शेतमालाच्या भावात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने घसरण होत आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच काही पालेभाज्या आणि फळवर्गीय भाज्यांचे दर कडाडले असतानाच, वांग्याचे दर झपाट्याने कोसळले आहेत. वांग्यासोबतच भेंडी आणि टरबूजाच्या भावात घसरण आहे. शिवाय पाणी टंचाई आणि वाढत्या उन्हाच्या झळांमुळे ‘मल्चिंग पेपर’वरची टरबूज शेती उन्हामुळे धोक्यात आली आहे. मोठ्याप्रमाणात उत्पादन खर्च केल्यानंतरही अपेक्षीत उत्पादन होत नसल्याने, शेतकºयांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला असून, भाजीपाला बाजारपेठेत नेण्याचाही खर्च निघत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे भाजीपाला बाजारपेठेत नेण्याऐवजी काही शेतकरी या पिकांचा जनावरांच्या चाºयासाठी उपयोग करीत असल्याचे चित्र परिसरात आहे.

शेतमाल बाजारपेठेत नेण्याचाच खर्च अधिक!

गेल्या काही दिवसांपासून बाजारात वांग्याचे दर कमालिचे घसरले आहेत. किरकोळ बाजारपेठेत वांगी ८ ते १० रुपये किलोप्रमाणे विकल्या जात आहेत. घाऊक बाजारपेठेत त्यापेक्षाही कमी दर किलोमागे मिळत आहे. मिळणाºया भावापेक्षा खर्च अधिक असल्याने खामगाव, नांदुरा आणि शेगाव तालुक्यातील शेतकरी उभ्या पिकाचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग करीत आहेत.उत्पादन खर्चापेक्षा मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतमालाचे भाव घसरले आहेत. त्यामुळे पिकविलेले उत्पादन बाजारपेठेत नेण्याचाही खर्च निघत नाही. नाईलाज म्हणून वांगी आणि इतर पिकांचा जनावरांना चारा म्हणून वापर करीत आहे.

- वासुदेव गव्हाळे, शेतकरी, ता. खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी