नालीची संरचना बदलल्याने नागरिकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 03:21 PM2020-02-24T15:21:39+5:302020-02-24T15:21:48+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रस्त्याची संरचना आणि आता नालीची संरचना बदलण्यात आली आहे.

Anger among citizens due to changing drain structure | नालीची संरचना बदलल्याने नागरिकांमध्ये संताप

नालीची संरचना बदलल्याने नागरिकांमध्ये संताप

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणादरम्यान रस्ता आणि नाली बांधकाम करताना ठिकठिकाणी संरचना बदलण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रस्त्याची संरचना आणि आता नालीची संरचना बदलण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी गुरूवारी पालिकेत तक्रार दाखल केली. दरम्यान, बसस्थानक चौक ते टॉवर चौकापर्यंतच्या काँक्रीटीकरणावर पाणी मारण्यात येत नसल्याने या परिसरात धुळीचे प्रंचड साम्राज्य पसरले आहे.
खामगाव शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाला गत एक वर्षभरापूर्वी सुरूवात करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समिती रस्त्यावरील एका व्यावसायिकाला वाचविण्यासाठी रस्त्याची संरचनाच बदलण्यात आली. त्यानंतर आता रस्त्याच्या दुसºया बाजूने नाली बांधकाम करताना नालीचीही संरचना बदलण्यात आली.
याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर स्थानिक नगर पालिका प्रशासनाकडेही नागरिकांनी तक्रार नोंदविली आहे.
रस्ता आणि नाली बांधकाम करताना करण्यात येत असलेला दूजाभाव तात्काळ बंद न केल्यास या रस्त्यावरील व्यावसायिकांनी तीव्र आंदोलनाचाही इशारा दिला आहे. येत्या आठ दिवसांत ही परिस्थिती न सुधारल्यास नालीची संरचना बदललेल्या ठिकाणी निदर्शने करण्यात येणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Anger among citizens due to changing drain structure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.