शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात वादातून ऑटोचालकावर कटरने हल्ला

By अनिल गवई | Updated: August 10, 2023 18:05 IST

परस्पर विरोधी तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

खामगाव - वादातून एका ३३ वर्षीय ऑटो चालकावर कटरने हल्ला करण्यात आला. ही घटना गुरूवारी दुपारी स्थानिक सुटाळपुरा भागात घडली. याप्रकरणी जखमी ऑटोचालकाच्या तक्रारीवरून हल्ला करणार्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हल्ला करणार्यानेही मारहाण झाल्याची तक्रार शिवाजी नगर पोलीसांकडे केली. परस्पर विरोधी तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सागर गजानन जामोदे याने शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, गुरूवारी दुपारी सुटाळपुरा भागातील एका गॅरेजवर तो बसला होता. दरम्यान, तिथे शंकर प्रल्हाद शेलकर याने त्यांच्याशी वाद घातला. काही समजण्याच्या आतच कटरने गालावर आणि उजव्या कानावर हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत केला. तसेच यावेळी झालेल्या झटापटीत काळ्या धाग्यातील दोन ग्रॅम सोन्याचे लॉकेट येथे पडल्याचेही तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीसांनी आरोपी शंकर प्रल्हाद शेलकर याच्या विरोधात भादंवि कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला.

शंकर प्रल्हाद शेलकर याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, गुरूवारी दुपारी तो सुटाळपुर्यातील प्रेसच्या दुकानावर काम करीत असताना आरोपी सागर जामोदे हा गुटखा खाऊन थुंकला. याबाबत त्याला हटकले असता, चापटा बुक्यांनी मारहाण करून कटरने उजव्या हाताच्या बोटाला मारून जखमी केल्याचा आरोप तक्रारीत केला. या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीसांनी सागर जामोदे विरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी