शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

डिडोळ्यातील युवकाच्या हत्येप्रकरणी एक आरोपी गजाआड

By सदानंद सिरसाट | Updated: June 15, 2024 19:26 IST

तीन दिवसांची पोलिस कोठडी, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

सदानंद सिरसाट, खामगाव, जि.बुलढाणा, मलकापूर : तालुक्यातील धरणगावात डिडोळ्यातील युवकाची हत्या केल्याच्या आरोपावरून गावातील एकास पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. इतर दोन संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. अटकेतील आरोपीला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने शनिवारी दिला. याप्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

धरणगाव येथील खंडोबा मंदिरानजिकच्या खुल्या सभागृहात मोताळा तालुक्यातील डिडोळ्याच्या २१ वर्षीय दीपक सुधाकर सोनोने याची हत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले होते. तसेच मृतकाचा भाऊ विजय सुधाकर सोनोने याच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघा संशयितांची पोलिस चौकशी सुरू होती. घटना अतिशय विचित्र पद्धतीने घडल्यामुळे आरोपींचा शोध पोलिसांसाठी आव्हान ठरले होते.

या घटनेत बुलढाणा येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. त्याने मलकापूर पोलिसांनी सर्वप्रथम ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या घराकडे मोर्चा वळवला होता. त्याचबरोबर देहबोलीतून संशय बळावला. त्या अनुषंगाने पोलिसांनी स्थानिक रहिवासी अनिल राजाराम इंगळे (४८) याला शुक्रवारी उशिरा रात्री अटक केली. शनिवारी दुपारी आरोपी अनिल राजाराम इंगळे याला न्यायालयात हजर करण्यात आले. तर इतर दोघा संशयितांची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक करुणाशील तायडे करीत आहेत.दारूवरून झाला वाद..!

मृत दीपक सोनोने व धरणगाव येथील रहिवासी दोघेही ट्रॅक्टर चालक आहेत. गुरुवारी रात्री ते एकत्र दारू प्यायले होते. त्यातूनच आधी शाब्दिक चकमक झाली. मग हाणामारी झाली. जबर मारहाणीत एकाचा मृत्यू झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी