शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटीबध्द!  - विद्याताई कावडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:29 IST

टिळक स्मारक महिला मंडळाच्या उत्सव प्रमुख विद्याताई कावडकर यांच्याशी साधलेला संवाद... 

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क  खामगाव: लोकमान्य टिळकांच्या स्मृतीत स्थापन झालेल्या महिला मंडळाचा महिलांच्या उत्थानासाठी सदैव पुढाकार राहीला आहे. पुरूषांच्या हस्तक्षेपाशिवाय संपूर्ण देशात चालणारी  आणि शतकपूर्ती करणारी ही एकमेव संस्था आहे. समाजातील अन्याय, अत्याचार ग्रस्त महिलांची सेवा हे कृतीशील व्रत आहे. टिळक स्मारक महिला मंडळाच्या उत्सव प्रमुख विद्याताई कावडकर यांच्याशी साधलेला संवाद... 

 ऐतिहासिक टिळक राष्ट्रीय महिला मंडळाची स्थापना कधी झाली? लोकमान्य टिळकांची सन १९१९ मध्ये खामगाव येथे एक सभा झाली. यासभेत स्त्रीयांनी सामाजिक कार्याकडे वळावे असे आवाहन केले. त्यानुसार महिलांनी संस्था काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, १ आॅगस्ट १९२० रोजी दुर्देवाने लोकमान्य टिळकांचे निधन झाले. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या स्मृतीत १६ नोव्हेंबर १९२० रोजी ‘टिळक स्मारक मंडळ’ाची स्थापना झाली.सुरूवातीला ५०-६० सदस्य संख्या असलेल्या या मंडळाच्या आता ३०० पेक्षा जास्त सभासद आहेत.

टिळक स्मारक महिला मंडळाने खामगाव व्यतीरिक्त इतर कोठे सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग दिलाय का?निश्चितच, ऐतिहासिक टिळक राष्ट्रीय महिला मंडळाचा समाजपयोगी आणि शासनाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमात कृतीशील सहभाग राहीला आहे. सन २०१४ साली अमरावती येथील प्रसिध्द हनुमान व्यायाम मंडळाने आयोजित केलेल्या एका सांस्कृतिक महोत्सवात स्त्री-भ्रूण हत्या या विषयावर एक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला आहे.

टिळक स्मारक महिला मंडळाशी आपण कशा जुळलात?स्त्रीयांची उन्नती आणि उत्कर्षासाठी बांधिलकी स्वीकारणाºया टिळक स्मारक महिला मंडळाशी गत ५५ वर्षांपासून आपले ऋणानुबंध जुळलेत. या मंडळाच्या माध्यमातून महिलांच्या उत्थानासाठी झटल्याचे समाधान आहे. आपल्या कार्यकाळातच टिळक स्मारक महिला मंडळाचा सूवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव आणि शताब्दी महोत्सव साजरा होत आहे. ही एक मोठी उपलब्धी आणि कृपाच आहे.

 

टिळक स्मारक महिला मंडळ ही खामगाव शहरातील केवळ एक ऐतिहासिक वास्तू नव्हे. तर समाजातील तळागाळातील महिलांच्या उत्थानाचा चालता-बोलता जीवनपट आहे. या मंडळाने  महिलांना स्वालंबी बनविण्यासाठी तसेच त्यांच्यावरील  अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी सदैव पुढकार घेतला आहे.  टिळक स्मारक महिला मंडळाच्या इतिहासाबाबत काय सांगाल?खामगाव येथील ऐतिहासिक टिळक स्मारक महिला मंडळाच्या पहिल्या अध्यक्षा प्रख्यात भावगीत गायक जी.एन.जोशी यांच्या मातोश्री ताई जोशी या मंडळाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या. त्यानंतर सुप्रसिध्द नाटककार, कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या सौभाग्यवती मंडळाच्या दुसºया अध्यक्षा झाल्या. सन १९४५ मध्ये मंडळाला २५ वर्ष पूर्ण झाले म्हणून संस्कारसंपन्न नवीनपिढी निर्माण करण्यासाठी बालकं मंदिर काढण्यात आले. कवी अनिल, राम शेवाळकर, अरूणा ढेरे,जयंत टिळक, अजित कडकडे, जितेंद्र अभिषेकी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या ऐतिहासिक मंडळाला भेटी दिल्या आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी टिळक स्मारक मंडळांचे मोठे योगदान राहीले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत