कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बालाजी महाराज संस्थानचे वंश पारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव हे उपस्थित होते. अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापक बी. बी. झिने, सेवानिवृत्त ग्रंथपाल डी. बी. सावरकर, सेेवानिवृत्त लिपिक बी.जी. वाजपे, एस. एस. खांडेभराड, सेवानिवृत्त शिपाई शेषराव झिने हे उपस्थित होते. देऊळगाव राजा नगराचे आराध्य दैवत श्री बालाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी माजी विद्यार्थी रवींद्र पुजारी यांच्या हस्ते राजे विजयसिंह जाधव यांचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रवींद्र पुजारी यांनी केले. यावेळी राजश्री डोईफोडे, नीता देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. आभार माजी विद्यार्थिनी अंजली मिनासे-सावजी यांनी मानले़ संचालन माजी विद्यार्थी गिरीश पापडे यांनी केले. यावेळी माजी विद्यार्थी संजय देशमुख, गणेश डोईफोडे, गजानन पुजारी, सतीश पुजारी, अमोल जिंतुरकर, दीपक मल्लावत, शे. अनिस, बंडू मुंढे, सुजित डोणगावकर, राजेश सपाटे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. काेराेनाविषयक नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला़
व्यंकटेश महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST