शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ३६ टक्के पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 14:00 IST

बुलडाणा जिल्ह्यात ३६ हजार ७१९ शेतकऱ्यांना २८९ कोटी ७३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पीक कर्ज वाटपाचा टक्का सुधारण्याच्या दृष्टीने जिल्हा अग्रणी बँकेने पावले टाकली असून १२ दिवसात दहा टक्क्यांनी पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात ३६ हजार ७१९ शेतकऱ्यांना २८९ कोटी ७३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.दुसरीकडे ३० सप्टेंबर २०१९ ही खरीपाचे पीक कर्ज वाटपाची अंतिम मुदत आहे. त्यामुळे येत्या दीड महिन्यात पीक कर्ज वाटपाची मोठी कसरत जिल्हा अग्रणी बँकेला करावी लागणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात तीन लाख ३३ हजार ९६५ शेतकऱ्यांना यावर्षी एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करावयाचे आहे. त्यापैकी एक लाख १५ हजार ६४२ शेतकरी पीक कर्जासाठी सध्या पात्र आहेत. जिल्ह्याचा वार्षिक पतआराखडा हा प्रामुख्याने कृषी क्षेत्रामध्ये अधिक तरतूद करणार आहे. औद्योगिक दृष्ट्या जिल्हा डी प्लसमध्ये असल्याने प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर जिल्हयाची मदार आहे. त्यातच जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची दोलायमान आर्थिक स्थिती पाहता जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, व्यापारी तथा सर्वाजनिक क्षेत्रातील बँकांवरच २०१३ पासून कृषी क्षेत्रामध्ये पीक कर्ज वाटपाची मदार येऊन ठेपली आहे. नाही म्हणायला जिल्हयात पतसंस्थांचे मोठे जाळे असून जिल्हयाच्या अर्थकारणात या पतसंस्थांचा जवळपास ७१ टक्के वाटा आहे तर राष्ट्रीयकृत, व्यापारी आणि ग्रामीण बँकांचा वाटा हा २९ टक्क्यांच्या आसापास आहे.त्यातच जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची एकंदरीत स्थिती काहीशी बिकट असल्याने प्रामुख्याने मोठ्या बँकांवरच पीक कर्जासाठी शेतकºयांची मदार आहे.ही बाब पाहता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आतापर्यंत जिल्ह्यातील २४ हजार ३४९ शेतकºयांना तब्बल १७९ कोटी ५२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. वास्तविक जिल्हयातील पीक कर्जाची गरज असलेल्या शेतकºयांचा विचार करता या क्षेत्रातील बँकांना दोन लाख ६६ हजार ५२७ शेतकºयांना पीक कर्ज देण्याचे उदिष्ट आहे. पैकी प्रत्यक्षात पीक कर्जासाठी ६५ हजार १२५ शेतकरी पात्र ठरलेले असून त्यापैकी ३७ टक्के शेतकºयांना सार्वजनिक क्षेत्रातील या बँकांनी पीक कर्ज दिले आहे. दरम्यान, अद्यापही पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढण्याची गरज व्यक्त केली जात आहे. व्यापारी बँकांचे ४७ कोटी वाटपपात्र शेतकºयांपैकी दोन हजार ७८१ शेतकºयांना व्यापारी बँकांनी ४६ कोटी ८० लाख ११ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. एकूण शेतकºयांपैकी या बँकांना २६ हजार ७६६ शेतकºयांना पीक कर्ज वाटप करावयाचे आहे. दरम्यान, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने चार हजार ३९४ शेतकºयांना ३६ कोटी ८३ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले असून त्याची टक्केवारी ही १३ टक्के जाते.

जिल्हा बँकेचे वाटप ५६ टक्के४जिल्हा बँकेने पाच हजार १९५ शेतकºयांना २६ कोटी ५७ लाख ४१ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्याची टक्केवारी ही ५६ टक्के जाते. या बँकेला नऊ हजार ४५० शेतकºयांना ४७ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करावयाचे आहे. आर्थिक दृष्ट्या फारशी सक्षम नसलेल्या या बँकेने आतापर्यंत पीक कर्ज वाटपाचा टक्का बºयाबैकी वाढता ठरवीला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी